IND Vs PAK: ही पोपटांची टीम… सुनील गावस्करांनी उडवली खिल्ली, नेमकं काय म्हणाले?

IND Vs PAK: सुनील गावस्कर यांनी पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक नवीन शब्द वापरला आहे आणि तो म्हणजे पोपट. तसेच त्यांनी भारताच्या विजयाविषयी बोलताना 65 वर्षांच्या इतिहासाची आठवण करुन दिली आहे.

IND Vs PAK: ही पोपटांची टीम... सुनील गावस्करांनी उडवली खिल्ली,  नेमकं काय म्हणाले?
pakistan team
Image Credit source: Francois Nel/Getty Images
| Updated on: Sep 15, 2025 | 12:13 PM

आशिया कप 2025मध् 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना खेळला गेला. दुबईत झालेल्या या सामान्याला भारतीयांनी विरोध केला होता. पण भारताच्या हातून पाकिस्तानचा संघ ज्या पद्धतीने पराभूत झाला, त्यानंतर त्याची वाईट अवस्था झाली आहे. पराभवानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. पाकिस्तानच्या संघाच्या कामगिरीवर प्रत्येकाकडे काही ना काही बोलण्यासारखे आहे. पण, सुनील गावस्कर यांनी जी गोष्ट सांगितली आहे ती आजची नाही, तर पाकिस्तानी क्रिकेटच्या 65 वर्षांच्या इतिहासावर आधारित आहे. सुनील गावसकर यांनी पाकिस्तानच्या सध्याच्या संघाला पोपट असे नाव दिले आहे. ते ऐकून अनेकांना हसू अनावर झाले आहे.

ही पाकिस्तानची नाही, पोपट टीम आहे – गावस्कर

भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सुनील गावस्कर म्हणाले की, ते हनीफ मोहम्मद यांच्या काळापासून, म्हणजेच 1960 पासून पाकिस्तानचे क्रिकेट आणि तिथला संघ पाहत आहेत. त्यांना आठवते की ते चर्चगेटवरून ब्रेबॉर्न स्टेडियमपर्यंत धावत-धावत जायचे, जेणेकरून हनीफ मोहम्मद यांना खेळताना पाहता येईल. पण त्यांनी कबूल केले की तेव्हापासून आतापर्यंत असा पाकिस्तानी संघ त्यांनी पाहिला नाही, जो सध्याचा आहे. ही पाकिस्तानची नाही, पोपट टीम आहे.

वाचा: तुफान ट्रेंडिंग असणारा विंटेज फोटो कसा तयार करायचा? फक्त या स्टेप्स करा फॉलो, काम झालंच म्हणून समजा!

सुनील गावस्कर गेल्या 65 वर्षांपासून पाकिस्तानचा क्रिकेट संघ पाहत आहेत. त्यामुळे त्यांनी सध्याच्या पाकच्या संघाला पोपट असे म्हणत केवळ टोमणा मारला नाही तर त्यांना वास्तवाची जाणीव करुन दिली आहे.

पाकिस्तानचा संघ कसा उघडा पडला?

सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानी संघाबद्दल असे बोलण्याचे कारण देखील आहे. सध्याच्या पाकिस्तानच्या संघात एका वेगवान गोलंदाजीची ताकद दिसत नाही, जी एकेकाळी होती. आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानचा संघ आपल्या वेगवान गोलंदाजीपेक्षा फिरकी गोलंदाजीवर जास्त अवलंबून असल्याचे पाहायला मिळाले होते. सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 128 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी 3 गडी गमावून पूर्ण केले. हा सामना टूर्नामेंटमधील भारताचा सलग दुसरा विजय होता, तर पाकिस्तानला दोन सामन्यांत पहिल्यांदा पराभव पत्करावा लागला.