AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens Asia Cup 2026 : भारत-पाक सामन्यात फुल्ल ड्रामा; 5 वेळा ट्विस्टवर ट्विस्ट; पाहा नेमकं काय घडलं?

पाकिस्तानला अवघ्या 55 धावांत गुंडाळून भारतीय महिला संघाने मोठा विजय मिळवला खरा, पण मैदानावर भलताच राडा सुरू होता. भारत-पाक सामन्यात असा कोणता हाय-व्होल्टेज ड्रामा घडला ज्याने सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे? जाणून घेऊयात.

Womens Asia Cup 2026 : भारत-पाक सामन्यात फुल्ल ड्रामा; 5 वेळा ट्विस्टवर ट्विस्ट; पाहा नेमकं काय घडलं?
India vs PakistanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 5:26 PM
Share

भारत विरुद्ध पाकिस्तान… सामना कोणताही असो, कीडा अन् थरार हा ठरलेलाच आहे. महिला आशिया कप 2026 मधील भारत-पाक महामुकाबल्यातही मैदानावर असाच ड्रामा पाहायला मिळाला. भारतीय महिला ब्रिगेडने पाकचा अवघ्या 55 धावांत सुपडा साफ करत 7 विकेट्सने धुव्वा उडवला खरा पण या विजयासोबतच मैदानावर घडलेल्या ५ भन्नाट प्रसंगांनी सोशल मीडियाचा पारा भलताच वाढवलाय.

टॉस झाला, पण ‘नो हँडशेक’

नाणेफेकीच्या वेळीच सामन्यातील तणावाची पहिली ठिणगी पडली. टॉस उडवल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना समोरासमोर आल्या, मात्र दोघींनीही हस्तांदोलन करणे टाळले. गेल्या काही काळापासून दोन्ही देशांतील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हा ‘नो हँडशेक’ पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला.

शेफालीचा इशारा अन् मुनीबा आऊट

पाकिस्तानच्या डावादरम्यान भारतीय स्टार शेफाली वर्माने मुनीबा अलीला तंबूत धाडलं. विकेट घेताच शेफालीचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. तिने थेट पाकच्या ड्रेसिंग रूमकडे हात दाखवत मुनीबाला बाहेरचा रस्ता दाखवला.

फातिमाचा बदला अन् एग्रेशन

भारताच्या फलंदाजीदरम्यान पाकची कर्णधार फातिमा सना या अपमानाचा बदला घ्यायला टपूनच बसली होती. तिने १२ धावांवर खेळणाऱ्या शेफाली वर्माची दांडी उडवली. विकेट मिळताच फातिमाने शेफालीच्या तोंडासमोर जाऊन ड्रेसिंग रूमकडे जाण्याचा जळजळीत इशारा केला. फातिमाच्या या अति-आक्रमक सेलिब्रेशनचा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरलही झाला.

कमेंटेटरचा सणसणीत टोला

फातिमाच्या त्या ओव्हर-द-टॉप सेलिब्रेशनवर समालोचक विवेक राजदान यांनी लाईव्ह कमेंट्रीतच तिची हवा काढली. “अहो मॅडम, 55 धावांवर ऑलआऊट झाला आहात, जरा स्कोअरबोर्डकडे पण बघा!” अशा आशयाचा सणसणीत टोला राजदान यांनी लगावला अन् नेटकऱ्यांनीही याला पाठिंबा दिला आहे.

इरफान पठाणचा पुन्हा तोच ‘संडे’ टोमणा

सामना संपताच भारताचा माजी ऑलराउंडर इरफान पठाणने एक्सवर (ट्विटर) जोरदार सिक्सर ठोकला. भारताच्या दणदणीत विजयानंतर इरफानने पोस्ट केली त्याने लिहिलं की, “आज संडे है क्या?” भारत-पाक सामने बहुतांश वेळा रविवारी होतात आणि भारताकडून पाकचा कचरा होतो, या जुन्या आठवणींना उजाळा देत इरफानने पाक चाहत्यांची उरली-सुरली खिल्ली उडवली आहे.

भारताचा धडाका सुरुच

मैदानावरील या घडामोडी आणि वाद रंगत असताना भारतीय महिला संघाने मात्र आपल्या खेळाने पाकिस्तानला साफ निष्प्रभ केले. भारतीय फिरकीपटूंच्या फिरकीच्या जाळ्यात पाकचा संपूर्ण संघ 55 धावांवर गारद झाला. हे किरकोळ आव्हान भारताने अवघ्या 8.4 षटकांत 3 गडी गमावून सहज पार केले. या विजयासह टीम इंडियाने आधीच निश्चित केलेले सेमीफायनलमधील स्थान आणखी मजबूत केले आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ