IND vs PAK: पाकिस्तानी फॅनने भारतीयांना डिवचलं, इंडियन फॅनने मात्र एका वाक्यात केली बोलती बंद, Video Viral
IND vs PAK Womens Asia Cup Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला आशिया कपमधील सामना रंगला. या सामन्यात पाकिस्तानी फॅनने भारतीय फॅनला डिवचायचा प्रयत्न केला पण त्याचीच कशी बोलती बंद झाली ते पाहा...

IND vs PAK Match: महिला आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला. हा सामना भारतीय संघाने जिंकला. भारतीय महिला संघाने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. दुबईत पाकिस्तानच्या संघावर मोठी नामुष्की ओढवली. पाकिस्तानचा संघ अवघ्या 55 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची सर्वात कमी धावसंख्या ठरलेली आहे. मॅच गमावल्यावर पाकिस्ताननी फॅन्सचे चेहरे पडले होते. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने पाकिस्तानी चाहते नको तसे वागायला लागले.
पाकिस्तानी फॅनने सोशल मीडियावर भारतीय महिलेसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यावेळी त्याने त्या महिलेला एक प्रश्न विचारला, ज्यावर आज्जीबाईने जो रिप्लाय दिला त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी फॅनने आज्जीला विचारलं की,” मॅडम तुम्ही या वयात मॅच पहायला आला आहात? तेव्हा भारतीय आजीने जे उत्तर दिलं त्याने सर्वांची बोलती बंद झाली आहे. आजी म्हणाल्या की, मग… माझं असं काय वय आहे?.” त्यानंतर पाकिस्तानी फॅनने भारतीयांचे कौतुक केले.
भारतीय फॅन्स असे असतात, त्यामुळे त्यांचे खेळाडूही इतके चांगले खेळतात, असं म्हणत त्या पाकिस्तानी फॅनने आपल्याच संघावर टिका केली. पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक पाहायला मिळाली. त्यांच्या एकाही बॅटरला मैदानात जास्त काळ टिकता आले नाही. 56 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचीही सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली पाहायला मिळाली नाही. दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले होते. मात्र, कमी धावसंख्येच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने विजयी शॉट मारला आणि सामना जिंकवला.
टीम इंडियाच्या बॅटिंगवेळी पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाने बॉलिंगची सुत्र हातात घेतली होती, शेफालीने फातिमाला देखील चोप चोप चोपले. दुसऱ्या बॉलवर चौकार मारल्यानंतर शेफालीने तिलाच टार्गेट करायचं ठरवलं पण तिसरा बॉल जास्त बाऊन्स झाल्याने शेफाली कॅच आऊट झाली. फातिमाने कॅच पकडताच शेफालीविरुद्ध अँग्रेसिव्ह सेलीब्रेशनही केले पण त्याचा काही विशेष फायदा झालेला नाही. तिने शेफालीला बाहेर जाण्याचा रस्ता हाताने दाखवणारे सेलिब्रेशन केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.