IND vs WI: विंडिजला रोखणं अवघड… ती भीती सांगत, उपकर्णधार तिलक वर्माने भारतीय संघालाच दिली चेतावणी

IND vs WI 4th T20 Match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरु असून चौथा टी-२० सामना आज रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा काय म्हणाला ते पाहा...

IND vs WI: विंडिजला रोखणं अवघड... ती भीती सांगत, उपकर्णधार तिलक वर्माने भारतीय संघालाच दिली चेतावणी
| Updated on: Oct 14, 2026 | 11:38 AM

IND vs WI 4th T20 Match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरु आहे. मालिकेतील चौथा सामना आज रंगणार आहे. या सामन्यापूर्वी लोकल बॉयने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहे, आजचा सामना हैदराबादमध्ये रंगणार आहे. लोकल बॉय तिलक वर्माने आता वेस्ट इंडिजविरुद्ध चौथा टी-२० सामन्यासाठी नेमकी रणनीती काय असणार हे बोलून दाखवले आहेत.

भारतीय उपकर्णधार तिलक वर्माने यावर जोर दिला आहे की, “आम्हाला वेस्ट इंडिजच्या बलाढ्य फलंदाजीला केवळ रोखण्याऐवजी विकेट्स घेण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गोलंदाजीच्या योजनेची योग्य अंमलबजावणी आम्ही करु.” भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील या व्हाईट-बॉल मालिकेदरम्यान खेळपट्ट्यांवरून बोर्डाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. एकदिवसीय मालिका असो किंवा टी-२० मालिकेतील पहिले तीन सामने असोत, खेळपट्ट्या गोलंदाजांसाठी पूर्णपणे प्रतिकूल होत्या आणि सपाट खेळपट्टीवर त्यांची चांगलीच धुलाई झाली.

Loading...

“वेस्ट इंडिज हा एक खूप चांगला संघ आहे, विशेषतः टी-२० फॉरमॅटमध्ये. ते खूप फ्रँचायझी क्रिकेट खेळतात, त्यामुळे त्यांना या फॉरमॅटमध्ये कसे खेळायचे हे माहित आहे. त्यांच्याकडे असलेली ताकद अविश्वसनीय आहे, प्रत्येकजण चेंडू जोरदार फटकावू शकतो. हे फक्त सलामीवीर किंवा तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाचे फलंदाजच करू शकतात असे नाही. त्यांचे सर्व खेळाडू चेंडू जोरदार फटकावू शकतात आणि अगदी ११ व्या क्रमांकाचा फलंदाजही येऊन फटकेबाजी करू शकतो. जोपर्यंत सर्व १० विकेट पडत नाहीत, तोपर्यंत सामना संपलेला नसतो. आपण गाफील राहून चालणार नाही.” असं म्हणत तिलकने विंडिज संघाबद्दल वाटत असलेली भीती बोलून दाखवली.

दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारताच्या गोलंदाजी विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पाहुण्या संघाने पॉवरप्लेचा फायदा घेत शानदारपणे लक्ष्य गाठले होते. तिलक म्हणाला की, संघाने त्या सामन्यातील आपल्या बचावात्मक दृष्टिकोनाचा आढावा घेतला आहे. गौतम गंभीर यांनी गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाला वर्चस्व गाजवू देण्याऐवजी अधिक आक्रमक होऊन विकेट्स घेण्यासाठी हल्ला चढवण्यास प्रोत्साहित केले आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us