Womens Asia Cup Final : लेडी सेहवाग अन् स्मृतीची वादळी खेळी! दोघींची धडाकेबाज अर्धशतकं; श्रीलंकेला 183 धावांचं आव्हान

Womens Asia Cup 2026 News : महिला आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताच्या सलामीवीरांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. शेफाली वर्माने अवघ्या 24 चेंडूंत अर्धशतक ठोकत विक्रम आपल्या नावावर केला, तर...

Womens Asia Cup Final : लेडी सेहवाग अन् स्मृतीची वादळी खेळी! दोघींची धडाकेबाज अर्धशतकं; श्रीलंकेला 183 धावांचं आव्हान
Shefali Verma Fastest Fifty
Image Credit source: BCCI Womens Twitter
| Updated on: Sep 13, 2026 | 9:54 PM

महिला आशिया चषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताच्या सलामी जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. ‘लेडी सेहवाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली वर्माने अवघ्या 24 चेंडूंत तुफानी अर्धशतक ठोकत इतिहास रचला, तर दुसरीकडे अनुभवी स्मृती मानधनानेही 35 चेंडूंत आपले धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. हे स्मृतीच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील 36 वे अर्धशतक ठरले. या दोन्ही सलामीवीरांनी मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करत भारताला दणकेबाज सुरुवात करून दिली. भारताने 5 विकेट्सच्या बदल्यात लंकेला 184 धावांचं आव्हान दिलं आहे.

शेफली वर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला. तिने अवघ्या 24 चेंडूंत ठोकलेले हे अर्धशतक महिला टी20 आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी हा विक्रम स्मृती मानधनाच्या (25 चेंडू, 2022) नावावर होता. शेफाली 39 चेंडूंत 68 धावांची तुफानी खेळी करून बाद झाली. या खेळीत तिने 9 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार खेचले. चामुडी प्रबोधाच्या चेंडूवर कर्णधार चमारी अटापट्टूकडे कॅच देऊन ती बाद झाली. तर स्मृतीही धावबाद झाली.

त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 14 धावा, रिचा घोषने 17 धावा केल्या, तर दीप्ती शर्मा 5 धावांवर धावबाद झाली. शेवटी गुणालन कमलिनीने अवघ्या 5 चेंडूंत 1 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 15 धावांची धडाकेबाज खेळी केली. भारती फुलमाली 2 धावांवर नाबाद राहिली. श्रीलंकेकडून मिताली अयोध्या, चमारी अटापट्टू आणि चामुडी प्रबोधा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघासाठी स्मृती आणि शेफाली यांनी 100 हून अधिक धावांची भागीदारी रचत श्रीलंकेला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. पण या दोघींच्या अर्धशतकांमुळे भारताने मोठी मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली.

महिला टी20 आशिया चषकातील सर्वात जलद अर्धशतके

महिला टी20 आशिया चषकातील सर्वात जलद अर्धशतकांचा विक्रम आता शेफाली वर्माच्या नावावर आहे. यापूर्वी 2022 मध्ये सिलहट येथे श्रीलंकेविरुद्ध 25 चेंडूंत अर्धशतक करणारी स्मृती मानधना या यादीत अव्वल होती. रिचा घोषने 2024 मध्ये यूएईविरुद्ध दांबुला येथे 26 चेंडूंत अर्धशतक केलं होतं. शेफालीनेही 2024 मध्ये नेपाळविरुद्ध दांबुला येथे आणि 2026 मध्ये थायलंडविरुद्ध दुबई येथे 26 चेंडूंत अर्धशतक झळकावलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us