Operation Sindoor : भारताने शोएब मलिकच्या घरावरही डागली मिसाइल
Operation Sindoor : स्थानिक काश्मिरींना भरती करुन त्यांना इथे ट्रेनिंग दिली जायची. जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये दहशतवादी हल्ले इथूनच केले जात होते. पठानकोट हल्ल्याचा कटही इथेच रचण्यात आला होता.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोएब मलिक एक मोठं नाव आहे. सानिया मिर्झाशी निकाह, घटस्फोट आणि क्रिकेट यामुळे शोएब मलिकला भारतातही सगळेजण ओळखतात. आज मध्यरात्री इंडियन एअर फोर्सने पाकिस्तान आणि POK मध्ये जेव्हा एअर स्ट्राइक केला, तेव्हा एक हल्ला शोएब मलिक जिथून येतो, तिथेही झाला. इंडियन एअरफोर्सने 7 मे रोजी एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तान आणि POK मधील नऊ ठिकाणांना लक्ष्य केलं. यात बहावलपूर, मुरीदके, गुलपुर, भींबर, चक अमरू, बाघ, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद आहे. या 9 जागांपैकी शोएब मलिकच घर सियालकोटमध्ये आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचा जन्म वर्ष 1982 साली सियालकोट येथे पंजाबी राजपूत मिडल क्लास कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांच मलिक फकीर हुसैन यांचं बुटांच एक छोटस दुकान होतं. दुकानाच्या कमाईतून वडिलांनी मुलाला क्रिकेटर बनवण्याच स्वप्न साकार केलं. 2006 साली शोएब मलिकच्या वडिलांच कॅन्सरने निधन झालं. पाकिस्तान क्रिकेटमध्ये नाव, ओळख, प्रसिद्धी, पैसा मिळाल्यानंतर शोएब मलिकने सियालकोट सोडून कराचीमध्ये घर बनवलं.
वडिलोपार्जित घर तिथेच राहणार
शोएब मलिक कुठेही रहायला गेला, तरी त्याचं वडिलोपार्जित घर सियालकोटमध्येच राहणार आहे. सध्या सियालकोट शोएब मलिकमुळे नाही, तर इंडियन एअर फोर्सच्या शूर जवानांनी टार्गेट केल्यामुळे चर्चेत आहे. आता प्रश्न हा आहे की, इंडियन एअर फोर्सने सियालकोटमध्ये स्ट्राइक का केला?
बॉर्डरपासून 12 ते 18 किलोमीटर अंतरावर
भारताला आपल्या गुप्तचर सूत्रांकडून सियालकोट येथे हिजबुल मुजाहिदीनच्या ट्रेनिंग सेंटरची माहिती मिळाली होती. आंतरराष्ट्रीय बॉर्डरपासून 12 ते 18 किलोमीटर अंतरावर असलेला मेहमूना ट्रेनिंग सेंटर जास्त चर्चेत नव्हतं, पण खूप घातक होतं. स्थानिक काश्मिरींना भरती करुन त्यांना इथे ट्रेनिंग दिली जायची. जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये दहशतवादी हल्ले इथूनच केले जात होते. पठानकोट हल्ल्याचा कटही इथेच रचण्यात आला होता.
