IND vs PAK : भारताकडून पाकची धूळधाण, लाजिरवाण्या पराभवामुळे मोहसिन नक्वी संतापले, संघाला डायरेक्ट सुनावलं..

T20 World Cup : रविवारी कोलंबोत झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानची धूळधाण उडवली. टीमन इंडियाने शानदार प्रदर्शन करत पाकिस्तानला 61 धावांनी हरवलं. मात्र संघाचा हा पराभव, लाजिरवाणी कामगिरी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वींना खूप झोंबली. सामना संपण्यापूर्वीच ते स्टेडियममध्येनिघून गेले. एवढंच नव्हे तर त्यांनी मेसेज पाठवून पाकिस्तांनी संघाला चांगलंच सुनावलं देखील..

IND vs PAK : भारताकडून पाकची धूळधाण, लाजिरवाण्या पराभवामुळे मोहसिन नक्वी संतापले, संघाला डायरेक्ट सुनावलं..
पाकच्या पराबव नक्वीच्या जिव्हारी लागला
Image Credit source: social media
| Updated on: Feb 17, 2026 | 1:42 PM

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup)बहुचर्चित सामना होता तो भारत आणि पाकिस्तानमधला (India vs Pakista) . रविवारी 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेच्या कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाक आमने सामने आले. मात्र या सामन्यात पाकिस्तानचा भारताने सहज धुव्वा उडवला. तब्बल 61 धावांनी ही मॅच जिंकत भारताने दिमाखदारपणे सुपर-8 मध्ये धडक मारली आणि पाकिस्तानी खेळाडू हात चोळत बसण्यापेक्षा दुसरं काहीच करू शकले नाहीत. या संपूर्ण सामन्यात असा एकही क्षण आला नाही जेव्हा पाकिस्तान जिंकण्याची शक्यता वाटत होती किंवा चांगल्या स्थितीतही तो संघ दिसत होता. पाकिस्तानच्या उस्मान तारिकने चांगली गोलंदाजी केली पण भारतातर्फे इशान किशनने सर्वच गोलंदाजांना चांगलचं फटकावलं.

ही बहुचर्चित मॅच पाहण्यासाठी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी हे देखील कोलंबोला आले होते. सामन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना भेटून त्यांना प्रोत्साहन दिले, मात्र मॅच संपायाला आल्यावर, पाकिसतानचा पराभव समोर दिसू लागल्यावर त्यांनी स्टेडियममधून पळ काढला. मॅच संपूण्यापूर्वीचे स्टेडियममधून निघून गेले.

नक्वी संतापले

ते चांगलेच संतापले होते. पीटीआयने एका अज्ञात सूत्राचा हवाला देत यासंबंधी एक वृत्त दिले आहे, भारताने पाकिस्तानला लोळवलं, 61 धावांनी पराभव केला, या पराभवानंतर मोहसिन नक्वी यांनी संघ व्यवस्थापक नावेद अक्रम चीमा यांच्याकडे संघाच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपण्यापूर्वीच मोहसिन नक्वी आर प्रेमदासा स्टेडियममधून निघून गेले. पाकिस्तान हरणार हे स्पष्ट झाल्यावर तो निघून गेले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत व्यवस्थापकांपर्यंत मेसेज पोहोचवत नाराजी व्यक्त केली. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाची अशी खराब कामगिरी समजण्यासारखी किंवा स्वीकारार्ह नाही असे ते म्हणाल्याचे समजते. पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन हे देखील, ड्रेसिंग रूममधील खेळाडूंशी, त्यांच्या खराब कामगिरीबद्दल बोलले आणि ाकिस्तानी खेळाडू त्यांच्या पूर्ण क्षमतेने खेळले नाहीत असंही त्यांना सुनावलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बाबर आणि आफ्रिदीची होणार गच्छंती ?

” जे झालं ते खूप झालं, आता पुरे, असा निर्णय मॅनेजमेंटच्या थिंक टँकने घेतला आहे. बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळावे आणि सलमान मिर्झा, नसीम शाह किंवा फखर झमान यांना समाविष्ट करावे.” असाही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितलं. पाकिस्तानचा पुढचा सामना, उद्या म्हणजेच, सामना बुधवारी नामिबियाविरुद्ध आहे, जर या सामान्यात नामिबिया जिंकला तर पाकिस्तान या स्पर्धेत,ग्रुप स्टेजमधून बाहेर पडेल. त्यामुळे त्यांच्यासाठी ही करो वा मरो अशी परिेस्थिती आहे.

Follow Us