India-England : इंडियाचे तीन खेळाडू बाद, इंग्लंडकडून भेदक गोलंदाजी

टीम इंडियाच्या दहा ओव्हरमध्ये 62 धावा झाल्या आहे.

India-England : इंडियाचे तीन खेळाडू बाद, इंग्लंडकडून भेदक गोलंदाजी
T20 World Cup T20 World Cup
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 10, 2022 | 2:26 PM

एडिलेड : टीम इंडिया (India) आणि इंग्लंडची (England) मॅच एडिलेडच्या मैदानात सुरु आहे. टीम इंडियाने 50 धावांमध्ये दोन गडी गमावले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहूल हे खेळाडू बाद झाले आहे, सध्या टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव मैदानात आहे. आजच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादव आणि विराट कोहली कशी खेळी करणार याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

टीम इंडियाच्या दहा ओव्हरमध्ये 62 धावा झाल्या आहे. विराट कोहली आणि सुर्यकुमार या दोन खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत चांगली खेळी केली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या टीमने काल एक सुर्यकुमार रोखण्यासाठी स्पेशल मिटींग घेतली.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

इंग्लंड टीम

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.