IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध सीरीज तर हरलो पण टीम इंडियाला बसले अजून दोन मोठे धक्के

IND vs ENG : भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध पाच सामन्यांची मालिका गमावली आहे. काल करो या मरो असलेल्या चौथ्या सामन्यातही भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला. इंग्लंडने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध सीरीज तर हरलो पण टीम इंडियाला बसले अजून दोन मोठे धक्के
Shreyas iyer
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 10, 2026 | 8:44 AM

इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या T20 सीरीजमध्ये टीम इंडियाचं आधीच खराब प्रदर्शन सुरु आहे. त्यात आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी दोन झटके बसले आहेत. मध्यमगती गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे ते सीरीजमधील उर्वरित दोन सामन्यात खेळू शकणार नाहीत. मंगळवारी ट्रेंट ब्रिजवरील तिसऱ्या सामन्यात त्यांना दुखापत झाली होती. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचं खूप सुमार प्रदर्शन सुरु आहे. आधी आयर्लंडमधील दोन टी20 सामन्यांची मालिका 2-0 ने गमावली. आता इंग्लंड विरूद्धच्या पाच सामन्यांची मालिका सुद्धा गमावली आहे. काल करो या मरो असलेल्या चौथ्या सामन्यातही भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला. इंग्लंडने मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

गुरुवारी ब्रिस्टॉलमध्ये चौथ्या टी20 सामन्याच्या टॉसवेळी भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीच्या दुखापती विषयी माहिती दिली. प्लेइंग 11 मध्ये वरुण आणि हर्षितची जागा वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांनी घेतली. या सीरीजमध्ये पहिला सामना पावसामुळे ड्रॉ झाला होता. दुसऱ्या सामन्यात 190 धावा करुनही पदरी पराभव आला. तिसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडच्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टिम इंडियाचा डाव 76 धावात ढेपाळला. काल चौथ्या टी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडने 14 षटकातच 1 विकेट गमावून हे आव्हान सहज पार केलं.

मोठ्या अपयशाचा आणि टीकेचा सामना

कॅप्टन म्हणून श्रेयस अय्यरला त्याच्या पहिल्याच परदेश दौऱ्यात मोठ्या अपयशाचा आणि टीकेचा सामना करावा लागतोय. याच टीमने काही महिन्यांपूर्वी सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. सात वर्षात पहिल्यांदाच टीम इंडियासोबत असं झालय, जेव्हा त्यांनी सलग दोन टी20 मालिका गमावल्या आहेत. टीम इंडियासोबत शेवटचं असं 2019 मध्ये झालं होतं. तेव्हा विराटच्या नेतृत्वाखाली बॅक टू बॅक दोन टी20 सीरीज गमावल्या होत्या. आधी न्यूझीलंड विरुद्ध त्यांच्या देशातील T20 सीरीज गमावली. मग मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज गमावली.

Follow Us