AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेची मोठी आनंदवार्ता! सरकारने बँकेत उघडले ते खाते, थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमाफी योजनेत निर्धारीत वेळेतच कर्जमाफी मिळावी यासाठी सरकारने कंबर कसली आहे. आयकर दात्या शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी लाबंली असली तरी इतर प्रक्रियांना वेग आला आहे.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेची मोठी आनंदवार्ता! सरकारने बँकेत उघडले ते खाते, थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
| Updated on: Jul 10, 2026 | 8:49 AM
Share

Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi Yojana 2026: शेतकरी कर्जमाफीचा दोनदा मुहूर्त टळल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पण सरकार दरबारी कर्जमाफीसाठीच्या प्रक्रिया सुरू आहेत. निर्धारीत वेळेत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी फडणवीस सरकारने कंबर कसली आहे. आयकर देणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे आणि त्यांना लाभ न देण्याचे धोरण ठरवण्यात आले आहेत. त्यासाठी कर्जमाफी लांबली आहे. पण इतर प्रक्रियांना वेग आला आहे. कर्जमाफीचा लाभ देण्यात दिरंगाई टाळण्यासाठी सरकारने वेगवान पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्यासाठी महत्त्वाचे खाते सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुरू करण्यात आले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पूल बँक खाते

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पूल बँक खाते उघडण्यात आले आहे. सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या नावाने हे खाते सुरू करण्यात आले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई येथील गव्हर्मेंट बिझनेस शाखेत हे खाते उघडण्यात आले आहे. या खात्यातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी वितरीत करण्यात येणार आहे. या खात्याच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेच्या निधी वितरणावर नियंत्रण, देखरेख ठेवण्यात येणार आहे.

पूल बँक खाती काय?

पूल बँक खात्यातंर्गत अनेक उप-खाती असतात. या खात्यात अनेक लाभार्थ्यांना एकाचवेळी निधी वितरीत करण्यासाठी एक केंद्रीय खाते तयार करण्यात येते. या मध्यवर्ती खात्यातून मग इतर खात्यात निधी वितरीत करण्यात येतो. बड्या कंपन्या कर्मचारी वेतनासाठी, निधी वितरणासाठी, बँका वा इतर मोठ्या संस्था अशा खात्याचा वापर करतात. सरकारकडेही अशी खाती असतात. त्यातून निधी वितरण आणि व्यवस्थापन करणे सोपे होते.

एका क्लिकवर धडाधड जमा होणार रक्कम

पूल खात्यातील निधी एका क्लिकवर अनेक खात्यात वितरीत होतो. हा निधी 24 तासांच्या आता संबंधित खात्यात जमा होतो. ती खाती मग कोणत्याही पतसंस्था, राष्ट्रीय, खासगी बँका असोत. त्यामध्ये एकाच केंद्रीयकृत खात्यातून रक्कम पाठवली जाते. पूल खात्यातील रक्कम कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. महाआयटी (MahaIT) या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन करत आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. योजनेत पारदर्शकता राहावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहेत.

कर्जमाफीचा मुहूर्त केव्हा?

सरकारने आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे हुडकण्यासाठी कर्जमाफी योजना लांबणीवर टाकली आहे. ही प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण होईल. पुढील आठवड्यात कदाचित कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. अद्याप सरकारने त्याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला