India Vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीला ‘विराट’ कामगिरी करण्याची संधी

| Updated on: Nov 23, 2020 | 11:11 AM

27 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

India Vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीला विराट कामगिरी करण्याची संधी
Follow us on

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला (India Tour Australia) सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होणार आहे. एकदिवसीय मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट कामगिरी करण्याची संधी आहे. विराटला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 2 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. india vs australia 2020 captain virat kohli has a chance to complete 2000 runs in the odi series against australia

विराटला 2 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 90 धावांची आवश्यकता आहे. विराटने 90 धावा पूर्ण केल्यास तो कांगारुंविरुद्ध 2 हजार धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय ठरेल. आतापर्यंत सचिन तेंडुलकर आणि हिटमॅन रोहित शर्मा यांनी ही कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा सचिन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. सचिनने कांगांरुविरुद्ध टीम इंडियाकडून खेळताना सर्वाधिक 3 हजार 77 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 हजार 208 धावा केल्या आहेत. दरम्यान रोहितला झालेल्या दुखापतीमुळे त्याची एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट आहे. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 हजार 910 धावा केल्या आहेत.

एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी 20 आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. विराट बाबा होणार असल्याने तो भारतात परतणार आहे. बीसीसीआयने विराटला पालक्तवाची रजा दिली आहे.

मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटला सचिनचे हे 2 विक्रम मोडित काढण्याची संधी

India vs Australia 2020 | वेगवान 12 हजारी विराट, शंभर नंबरी चहल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली-युजवेंद्रला विक्रमाची संधी

india vs australia 2020 captain virat kohli has a chance to complete 2000 runs in the odi series against australia