India vs Australia 2020 | वेगवान 12 हजारी विराट, शंभर नंबरी चहल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली-युजवेंद्रला विक्रमाची संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

India vs Australia 2020 | वेगवान 12 हजारी विराट, शंभर नंबरी चहल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोहली-युजवेंद्रला विक्रमाची संधी
फोटो सौजन्य : आरसीबी ट्विटर
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 9:53 PM

सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची ( India Tour Australia) सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. या एकूण 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होत आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांचे खेळाडू नेट्समध्ये कसून सराव करत आहेत. टीम इंडियाचे खेळाडू कांगारुंशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत. दरम्यान या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना ‘विराट’ कामगिरी करण्याची नामी संधी आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) विक्रम करण्याची संधी आहे. India vs Australia 2020 Opportunity for Team India’s players to set a record in the ODI series against Australia

विराटला वेगवान आणि 12 हजार धावांची संधी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला एकदिवसीय कारकिर्दीतील 12 हजारांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. विराटने आतापर्यंत एकूण 239 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 11 हजार 867 धावा केल्या आहेत. म्हणजेच विराटला 12 हजारांचा पल्ला पार करण्यासाठी केवळ 133 धावांची आवश्यकता आहे. विराटला 3 एकदिवसीय सामन्यात 133 धावा करण्याची संधी आहे. विराटने असे केल्यास तो सर्वात वेगवान अर्थात कमी सामन्यात 12 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग आणि श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महिला जयवर्धने यांनी ही कामगिरी केली आहे. सचिनने 300, पॉन्टिंगने 314, संगकाराने 336 तर जयवर्धनने 399 डावांमध्ये 12 हजार धावा केल्या आहेत.

विराटकडे पॉन्टिंगला पछाडण्याची संधी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. तेंडुलकरने 100 आंतरराष्ट्रीय शतकं लगावली आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग आहे. पॉन्टिंगने 71 शतकं लगावली आहेत. विराटच्या नावावर 70 शतकांची नोंद आहे. त्यामुळे विराटकडे पॉन्टिंगच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाच्या बरोबरीची तसेच तो विक्रम मोडित काढण्याची संधी आहे.

शंभर नंबरी चहल

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल. चहल एकदिवसीय सामन्यात विकेट्सच्या शतकापासून 9 विकेट्स दूर आहे. चहलने आतापर्यंत 52 वनडे सामन्यात 91 फलंदाजांना बाद केलं आहे. चहलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वनडे सामन्यात विकेट्सचं शतक पूर्ण करण्याची संधी आहे. जर चहलने 9 विकेट्स घेतल्या तर तो सर्वात कमी म्हणजेच 55 डावांमध्ये वेगवान 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.

शमी दबदबा कायम राखणार?

टीम इंडियाचा वेगवान आणि महत्वाचा गोलंदाज मोहम्मद शमी. शमी 2019 मध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. शमीने 2019 मध्ये 21 सामन्यात 42 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे यावेळेसही शमीकडून अशाच धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. शमी आपला दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

मालिकानिहाय सामन्यांचं वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India Tour Australia | विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होईल अशी आशा होती, पण.. सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया

India vs Australia 2020 | मालिका जिंकण्यासाठी गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरणार : झहीर खान

India vs Australia 2020 Opportunity for Team India’s players to set a record in the ODI series against Australia

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....