AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होईल अशी आशा होती, पण.. सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया

सूर्यकुमारने आयपीएलच्या 13 व्या मोसमात धमाकेदार फलंदाजी केली.

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होईल अशी आशा होती, पण.. सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Nov 21, 2020 | 5:39 PM
Share

मुंबई : सूर्यकुमार यादव (Mumabi Indians Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्सचा धमाकेदार फलंदाज. सूर्यकुमारने आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) तडाखेदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Australia)सूर्यकुमारची नक्कीच निवड होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सूर्यकुमारची एकदिवसीय, टी 20 किंवा कसोटी या तीनपैकी कोणत्याही मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. चमकदार कामगिरीनंतरही सूर्युकमारला संधी मिळाली नाही. यावरुन नेटीझन्सने निवड समितीला अनेक प्रश्न केले. सूर्यकुमार यादव ट्विटरला ट्रेंड झाला. अनेक नेटीझन्स सूर्यकुमारच्या बाजूने उभे राहिले. दरम्यान सूर्यकुमारने निवड न झाल्याबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे. India vs Australia 2020 It was hoped that Australia would be selected for the tour, but Suryakumar Yadav’s first reaction

“ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली. तेव्हा मी फार निराश होतो. माझी निवड होईल, अशी मला आशा होती. मी आयपीएलमध्ये चांगली फंलदाजी करत होतो. मी गेल्या 2 वर्षांपासून चांगली कामगिरी करत होतो”, अशी प्रतिक्रिया सूर्यकुमारने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान दिली.

“माझी निवड झाली नाही. मात्र मी यानंतर फार विचार करत बसलो नाही. जेव्हा टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली, तेव्हा मी जीममध्ये होतो. निवड न झाल्याने मी निराश होऊन सराव बंद केला. माझ्याकडे एक दिवसाचा वेळ असल्याने मी जीममध्ये प्रशिक्षकांकडून ट्रेनिंग घेत होतो. निवड न झाल्याची बाब डोक्यातून काढण्याचा प्रयत्न करत होतो. त्या रात्री मी जेवणही केलं नव्हतं. माझं कशातही मन लागत नव्हतं. मी तेव्हा कोणाशी बोललोही नाही”, असं सूर्यकुमार म्हणाला.

रोहितने येऊन प्रोत्साहित केलं

“मी निराश असल्याचं पाहून रोहित शर्मा माझ्याजवळ आला. रोहितने माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. निवड झाली नाही, याबाबत फार विचार करु नकोस. तुला नक्कीच संधी मिळेल. त्या संधीची वाट बघ. तुझ्याकडे निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांच लक्ष वळवण्याची संधी आहे. ती संधी दवडू नकोस”. असा सल्ला रोहितने दिल्याचं सूर्यकुमार म्हणाला.

रवी शास्त्रींचा ‘सूर्य’नमस्कार (Ravi Shastri)

सूर्यकुमारने या मोसमात चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतरही त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी देण्यात आली नाही. यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri)यांनी काही दिवसांपूर्वी सूर्यकुमारला ट्विटद्वारे संदेशा दिला होता. ‘सूर्य नमस्कार, असाच कणखर रहा आणि धीर ठेव, असा मेसेज शास्त्री यांनी दिला होता.

सूर्यकुमारची आयपीएलच्या 13 व्या मोसमातील कामगिरी

सूर्यकुमार आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील 16 सामने खेळला. या 16 सामन्यात त्याने 4 अर्धशतकांसह 480 धावा केला. ईशान किशन आणि क्विंटन डी कॉकनंतर सूर्यकुमार मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs RCB : सामना एक, किस्से अनेक – सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न, हार्दिक-मॉरिसचं शाब्दिक युद्ध, रवी शास्त्रींचा ‘सूर्य’नमस्कार

Australia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी BCCI वर संतापले

India vs Australia 2020 It was hoped that Australia would be selected for the tour, but Suryakumar Yadav’s first reaction

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.