India Tour Australia | विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली

भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली असल्याचं चित्र आहे.

India Tour Australia | विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 8:24 AM

अ‌ॅडलेड :   टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी  (India Tour Australia) सिडनीमध्ये पोहचली आहे. अवघ्या काही दिवसांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया अनुक्रमे टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना अ‌ॅडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली असल्याचं चित्र आहे. (Virat kohli IND VS Australia test match ticket Adelaide)

अ‌ॅडलेडमध्ये होणारी पहिली टेस्ट मॅच डे नाईट फॉरमॅटमध्ये असणार आहे. ही एकमेव टेस्टमॅच असेल ज्यामध्ये विराट कोहली खेळणार आहे. पहिल्या टेस्ट मॅचनंतर विराट मायदेशी परतणार आहे. जानेवारी महिन्यात विराट बाबा होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने त्याची खास पालकत्व रजा मंजूर केली आहे. त्यामुळे पहिल्या मॅचमध्ये विराटला खेळताना पाहणे चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. याचमुळे तिकीटांची मागणी वाढल्याची चर्चा आहे.

अ‌ॅडलेडमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीची खूपच चर्चा आहे. या मॅचसंबंधी विविध आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. तसंच प्रेक्षकांमध्ये या मॅचची उत्सुकता देखील कमालीची आहे, असं तिकीट विक्रेते मलिक अंगद सिंह ओबेरॉय यांनी सांगितलं. दुसरीकडे अ‌ॅडलेडमधली कसोटी डे नाईट फॉरमॅटमध्य होणार असल्याने देखील प्रेक्षक चांगलेच खूश आहेत. यामुळेही तिकीट विक्री वाढली असल्याचं निरीक्षकांचं म्हणणं आहे.

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट टीम इंडियासाठी तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळण्यात येणार आहेत. या मालिकेतील दुसरा, तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे 26 डिसेंबर, 7 आणि 15 जानेवारी 2020 ला खेळण्यात येणार आहे. विराटच्या घरी या कालावधी दरम्यान नवीन पाहुणा येणार असल्याने विराटने शेवटच्या 3  कसोटीतून माघार घेतली आहे. (Virat kohli IND VS Australia test match ticket Adelaide)

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.