India vs Australia 2020 | मालिका जिंकण्यासाठी गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरणार : झहीर खान

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

India vs Australia 2020 | मालिका जिंकण्यासाठी गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरणार : झहीर खान

मुंबई : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India vs Australia 2020) सुरुवात 27 नोव्हेंबरपासून होत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. यानंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. “या तीनही मालिकांमध्ये दोन्ही संघांच्या गोलंदाजांची भूमिका निर्णायक असणार आहे. दोन्ही संघांकडे आक्रमक आणि सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहेत”, असं मत टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने (Zaheer Khan) व्यक्त केलं आहे. टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी तर ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससारखे गोलंदाज आहेत. india vs australia 2020 performance of the bowlers will be decisive said india former faster bowler zaheer khan

“ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर नेहमीच बाउन्स आणि वेग असतो. त्यामुळेच एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिकेचा निर्णय हा गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. तसेच जो संघ प्रतिस्पर्ध्याला कमी धावांवर रोखेल, तोच संघ यशस्वी होईल. प्रतिभावान गोलंदाज म्हटल्यावर ज्या गोलंदाजींची नाव येतात, ते सर्व गोलंदाज या मालिकेत खेळणार आहेत. त्यामुळे यावेळेस चांगली रंगत पाहायला मिळणार आहे”, असंही झहीर म्हणाला.

“टीम इंडियासमोर कडवे आव्हान”

“ऑस्ट्रेलिया संघात स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे. टीम इंडियाने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत विजय मिळवला. या कसोटी सामन्यात कांगारुंचा 2-1 च्या फरकाने पराभव केला. मात्र तेव्हा वॉर्नर आणि स्मिथ संघात नव्हते. मात्र यावेळेस हे दोन्ही खेळाडू संघात आहेत. त्यामुळे टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे”, असंही झहीर म्हणाला. चेंडू कुरतडल्या प्रकरणी या दोन्ही खेळाडूंवर एक वर्षांचे निलंबन करण्यात आलं होतं.

“प्रबळ दावेदार कोणीच नाही”

या मालिकांध्ये कोणताच संघ प्रबळ दावेदार नाही. कारण दोन्ही संघांकडे दमदार फंलदाजांसह तगडे गोलंदाज आहेत. यामुळे सर्व सामने हे अटीतटीचे होणार आहेत, असंही झहीरने नमूद केलं.

मालिकानिहाय सामन्यांचं वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

India Tour Australia | विराट कोहलीमुळे अ‌ॅडलेड कसोटीसाठी तिकीटांची मागणी वाढली

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होईल अशी आशा होती, पण.. सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया

india vs australia 2020 performance of the bowlers will be decisive said india former faster bowler zaheer khan

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI