India vs England 2nd T20I | पराभवानंतरही संघात बदल होणार नाही, आम्ही असेच खेळणार, स्टार खेळाडूची प्रतिक्रिया

इंग्लंड विरुद्धचा दुसरा टी 20 सामना (india vs england 2nd t 20i) रविवारी 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरकडून (shreyas iyer) मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

India vs England 2nd T20I | पराभवानंतरही संघात बदल होणार नाही, आम्ही असेच खेळणार, स्टार खेळाडूची प्रतिक्रिया
इंग्लंड विरुद्धचा दुसरा टी 20 सामना (india vs england 2nd t 20i) रविवारी 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरकडून (shreyas iyer) मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England 2nd T20I) यांच्यात उद्या (14 मार्च) दुसरा टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. मॅचला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोर जावे लागले होते. त्यामुळे हा दुसरा सामना जिंकण्याच्या उद्देशाने विराटनसेना मैदानात उतरेल. दरम्यान पहिल्या सामन्यात टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे संघात रोहित शर्माला (Rohit Sharma) संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रोहितला संधी मिळणार की नाही, हे तर उद्याच समजेल. पण टीम इंडिया आपल्या फलंदाजीच्या शैलीत कोणताही बदल करणार नाही. असं म्हटलंय फलंदाज श्रेयस (Shreyas Iyer) अय्यरने. (india vs england 2nd t 20i shreyas iyer reaction on batting style)

श्रेयस काय म्हणाला?

“पराभव झाला असला तरीही आम्ही आमच्या बॅटिंग करण्याच्या शैलीत कोणताही बदल करणार नाही. आपल्या बॅटिंगमध्ये खोली आहे. शेपटीच्या फलंदाजांमध्येही फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे बॅटिंगमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही. आम्ही रणनिती आखली आहे. त्यानुसार आम्हाला काम करावे लागेल. कारण आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही सीरिज महत्वाची आहे. या मालिकेत आम्हाला अनेक प्रयोग करायचे आहेत”, असं अय्यरने स्पष्ट केलं.

“संघातील स्थानाबाबत दबाव नाही”

संघात स्थान मिळवण्यापेक्षा ते कायम राखणं हे आव्हानात्मक असतं. श्रेयसला आतापर्यंत अनेकदा आत बाहेर केलं आहे. या मालिकेसाठी मुंबईकर सूर्यकुमार यादवलाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अय्यरसाठी धोक्याची घंटा आहे. “मात्र माझ्यावर कुठलाच दबाव नाही. असं काहीच नाही. मी मुक्तपणे खेळतो. माझ्या खेळाचा आनंद घेतो”, अशी प्रतिक्रिया श्रेयसने दिली.

श्रेयसची अर्धशतकी खेळी

श्रेयसे इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळी केली. श्रेयसने फटकेबाजी करत 48 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 67 धावांची खेळी केली. त्यामुळे श्रेयसकडून दुसऱ्या सामन्यातही अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England T20 Series | मी इंग्लंड विरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज, ‘हा’ आक्रमक फलंदाज इंग्लंडला पराभूत करण्यासाठी उत्सुक

India vs England 1st T20 | नरेंद्र मोदी मैदानाच्या खेळपट्टीवर विराट कोहलीचं मोठं भाष्य

(india vs england 2nd t 20i shreyas iyer reaction on batting style)

Published On - 7:31 pm, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI