इंग्लिश बॅट्समन माझा ‘हा’ खास प्लॅन समजूच शकत नव्हते, अक्षर पटेलचा खुलासा

| Updated on: May 28, 2021 | 7:12 AM

 भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची बोलिंग खेळताना इंग्लिश फलंदाजांना अडचणी आल्या, असं खुद्द अक्षर पटेलने एका मुलाखतीत सांगितलं. (India vs England Axar Patel Special Plan For England batsman)

इंग्लिश बॅट्समन माझा हा खास प्लॅन समजूच शकत नव्हते, अक्षर पटेलचा खुलासा
अक्षर पटेल
Follow us on

मुंबई : भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची बोलिंग खेळताना इंग्लिश फलंदाजांना (India vs England) अडचणी आल्या, असं खुद्द अक्षर पटेलने (Axar patel) एका मुलाखतीत सांगितलं. माझी बोलिंग न समजल्यामुळे माझ्याविरुद्ध इंग्लिश खेळाडू फक्त रिव्हर स्वीप किंवा स्वीप हे दोनच फटके खेळायचे, असं अक्षर म्हणाला. अक्षरने मार्च महिन्यात पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 27 विकेट घेतल्या. आता अक्षर न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याचा हिस्सा आहे. (India vs England Axar Patel Special Plan For England batsman)

माझ्याविरोधात खेळताना इंग्लिश खेळाडूंना अडचणी आल्या

अक्षर पटेल इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला, माझ्याविरोधात खेळताना इंग्लिश खेळाडूंना शंका होती, त्यांना माझी बोलिंग न समजल्यामुळे त्यांनी नवीन कोणताही प्रयोग न करता केवळ स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचा वापर त्यांनी केला. माझ्या हातातून सुटलेला बोलला त्यांना ओळखता यायचा नाही ते फक्त बॉलचा टप्पा बघत होते. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे दोघे स्पिनर असल्यानंतर आणखी कोणत्या ऑलराऊंडरला संघात जागा बनवणं मुश्कील होऊन जातं कारण ही जोडी कमालीची बोलिंग करते, पण संधी मिळाल्यावर बाकी गोलंदाजही चांगली कामगिरी करतात, असंही अक्षर पटेल म्हणाला.

जाडेजा असल्याव माझी जागा मुश्किल

माझ्यात काही कमी आहे असा मी अजिबात मानत नाही. दुर्दैवीरित्या मी दुखापतग्रस्त झालो आणिइंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडलो. कसोटी मॅचमध्ये रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन ही जोडी चांगली कमाल करत होती. जाडेजा खूप चांगला खेळत होता जर तो असेल तर मला संघात जागा मिळणे मुश्कील होऊन बसतं, असंही अक्षर पटेल याने यावेळी नमूद केलं.

इतर गोलंदाजांपेक्षा मी वेगळा

अक्षर पटेल म्हणाला, कुलदीप यादव आणि चहलची जोडीही चांगली कमाल करत होती. टीम व्यवस्थापकांच्या अनुसार मी त्यावेळेस संघाबाहेर होतो. ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी स्वतःला सिद्ध करत होतो. मी बाकी गोलंदाजांपेक्षा वेगळा आहे. कारण मी गतीने बॉलिंग करतो. ज्या वेळी मी अनिल कुंबळे आणि आर अश्विन यांच्यासारख्या सिनिअर खेळाडूंना भेटतो त्यावेळी मी त्यांना एकच प्रश्न विचारतो की मला आणखी चांगलं प्रदर्शन कसं करता येईल?, त्यासाठी मी काय करणं आवश्यक आहे? तसंच स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, असं अक्षर म्हणाला.

(India vs England Axar Patel Special Plan For England batsman)

हे ही वाचा :

‘नाद करा पण माझा कुठं…’ म्हणण्याची आर. अश्विनला संधी, WTC फायनलमध्ये विक्रम करणार?

Couple Goals : भारतीय क्रिकेटपटूचं पत्नीसोबत जबरदस्त वर्कआऊट, VIDEO पाहून चक्रावून जाल

WTC Final: न्यूझीलंडला मात देण्यासाठी भारतीय संघाचा ‘सिक्रेट प्लॅन’, 72 तासांच विशेष मिशन