‘क्या कमाल का खिलाडी हैं’…, इंझमामची रिषभ पंतवर स्तुतीसुमने

| Updated on: Jun 29, 2021 | 1:50 PM

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमामने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना रिषभची स्तुती केली आहे. पंत कमाल खेळाडू आहे. मी खूप दिवसांतून असा खेळाडू पाहिलाय, असं इंझमाम म्हणाला. Inzmam Ul Haq Appriciate Rishabh pant

क्या कमाल का खिलाडी हैं..., इंझमामची रिषभ पंतवर स्तुतीसुमने
Inzmam And Rishabh pant
Follow us on

मुंबई : भारतीय संघातील उज्वल भविष्याचा खेळाडू म्हणजे रिषभ पंत (Rishabh Pant). ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये रिषभने स्वत:ला सिद्ध केलंय. जगातील दिग्गज खेळाडू रिषभची तारीफ करतायत. पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू इंझमान उल हकला (Inzmam Ul Haq) देखील रिषभच्या खेळाची भुरळ पडलीय. ‘क्या कमाल का खिलाडी हैं’, अशा शब्दात इंझमामने रिषभचं कौतुक केलंय. (India Vs England Inzmam Ul Haq Appriciate Rishabh pant Inning)

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमामने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना रिषभची स्तुती केली आहे. पंत कमाल खेळाडू आहे. मी खूप दिवसांतून असा खेळाडू पाहिलाय. काही वर्षांनंतर मी असा खेळाडू पाहिलाय की जेवढा विचार आपण करतो त्याच्यापेक्षा तो अधिक चांगला खेळतो. त्याला मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाहिलाय तसंच इंग्लंडविरुद्ध खेळताना देखील पाहिलाय. तो अप्रतिम खेळतोय, असं इंझमाम म्हणाला.

जसे रिचडर्स होते तसाच पंत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतने अप्रतिम खेळी केली. त्याची बॅटिंग पाहून असं वाटतंच नव्हतं की तो विदेशी खेळपट्टीवर खेळतोय. त्याने ऑस्ट्रेलियात मॅचविनिंग नॉक खेळले. त्याची तारीफ करावी तेवढी कमी आहे. 70 च्या दशकात वेस्ट इंडिज आणि अन्य संघांमध्ये रिचर्ड्स यांच्यामुळे मोठं अंतर होतं. आता सध्याच्या परिस्थितीत पंतही भारतासाठी धमाकेदार इनिंग खेळून संघाला जिंकवून देतोय, असं इंझमाम म्हणाला.

इयान बेलकडूनही रिषभचं कौतुक

“इएसपीयन क्रिक इन्फोशी बोलताना इयान बेलने रिषभचं तोंडभरुन कौतुक केलं. मी त्याच्याशिवाय भारतीय संघाची कल्पना देखील करु शकत नाही. मला असं वाटतं की रिषभ भारताचं भविष्य आहे आणि तो जागतिक स्तरावरचा सर्वोत्तम खेळाडू बनण्याच्या रस्त्यावर आहे. त्याचं भविष्य उज्वल आहे. त्याच्याजवळ अलोट प्रतिभा आहे. तो अविश्वसनीय खेळाडू आहे. तो मॅचविजेता खेळाडू आहे”, अशी एकाहून एक स्तुतीसुमने बेलने रिषभवर उधळली.

“रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही मालिकेत निर्णायक क्षणी चांगलं प्रदर्शन केलं. कसोटी, ट्वेन्टी आणि एकदिवसीय मालिकेत त्याने शानदार खेळी केली. मी त्याच्यात एक शांत चित्ताचा विकेट कीपर फलंदाज पाहिलाय. त्याने संघाला गरज असताना जोखीम पत्करणारे शॉट न खेळता संघाला आधार दिला आणि भूमिका जबाबदारीने सांभाळली.”

(India Vs England Inzmam Ul Haq Appriciate Rishabh pant Inning)

हे ही वाचा :

इंग्लंडचा इयान बेल भारतीय खेळाडूवर फिदा, म्हणतो, ‘त्याच्याशिवाय मी भारतीय संघाची कल्पनाच करु शकत नाही!’

Irfan Pathan Corona : सचिन, युसूफ पाठोपाठ इरफान पठाणही कोरोना पॉझिटिव्ह!

IND vs ENG : सॅम करनच्या जबरदस्त खेळीमागे महेंद्रसिंह धोनीचा हात?