AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Irfan Pathan Corona : सचिन, युसूफ पाठोपाठ इरफान पठाणही कोरोना पॉझिटिव्ह!

भारतीय संघाचा माजी ऑलराऊंडर आणि युसूफचा भाऊ इरफान पठाणलाही कोरोनाने गाठलं आहे. इरफानने सोमवारी आलल्या ट्विटरवर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.

Irfan Pathan Corona : सचिन, युसूफ पाठोपाठ इरफान पठाणही कोरोना पॉझिटिव्ह!
भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
| Updated on: Mar 29, 2021 | 11:57 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज, मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर माजी धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाणची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. त्यापाठोपाठ आता भारतीय संघाचा माजी ऑलराऊंडर आणि युसूफचा भाऊ इरफान पठाणलाही कोरोनाने गाठलं आहे. इरफानने सोमवारी आलल्या ट्विटरवर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. आपल्याला कोरोनाचे कुठलेही लक्षणं नाहीत. पण कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आपण होम आयसोलेशनमध्ये असल्याचं इरफानने सांगितलंय.(Former India all-rounder Irfan Pathan’s corona test positive)

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर इरफानने आपल्या संपर्कातील सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन केलं आहे. दोन दिवसांपूर्वी इरफानचा लहान भाऊ युसूफ पठाणही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. इरफान आपल्या भावासह नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड टी – 20 सिरीजमध्ये खेळला होता. या सिरिजमध्ये दिग्गज भारतीय खेळाडूंचा सहभाग होता. या टीमचे कर्णधार सचिन तेंडुलकर होता. सचिनची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.

‘चाचणी पॉझिटिव्ह पण लक्षणे नाहीत’

इरफानने सोमवारी रात्री ट्वीट करुन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. “मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. पण मला कुठल्याही प्रकारचे लक्षणं नाहीत. स्वत:ला आयसोलेट करुन घेत मी घरातच क्वारंटाईन झालो आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना आग्रह आहे की त्यांनी आपली कोरोना चाचणी करावी”, असं आवाहन इरफानने केलं आहे.

युसूफ पठाणलाही कोरोना

टीम इंडियाचा माजी खेळाडू युसूफ पठाणला कोरोनाची लागण झाली आहे. युसूफने स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबदरदारी आणि औषध घेतली आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्यांनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो”, असं युसूफ ट्विटरवर म्हणाला आहे.

संबंधित बातम्या : 

Yusuf Pathan Corona : सचिन तेंडुलकर पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका धडाकेबाज माजी खेळाडूला कोरोनाची लागण

Sachin Tendulkar Corona : सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

Former India all-rounder Irfan Pathan’s corona test positive

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.