IND vs ENG : सॅम करनच्या जबरदस्त खेळीमागे महेंद्रसिंह धोनीचा हात?

तिसरा आणि निर्णायक सामना भारताने अवघ्या 7 धावांनी जिंकला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने (Sam Curran) जवळपास भारताचा विजय खेचून आणला होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:00 PM, 29 Mar 2021
IND vs ENG :  सॅम करनच्या जबरदस्त खेळीमागे महेंद्रसिंह धोनीचा हात?
Sam Curran_MS Dhoni

पुणे : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसऱ्या सामन्यासह वन डे मालिका टीम इंडियाने (Team India) जिंकली. पुण्यात झालेला तिसरा आणि निर्णायक सामना भारताने अवघ्या 7 धावांनी जिंकला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने (Sam Curran) जवळपास भारताचा विजय खेचून आणला होता. सॅक करनने एकाकी झुंज दिली. त्यामुळेच 330 धावांचं भलंमोठं लक्ष्य देऊनही भारताला (India vs England 3rd Odi)  हा सामना केवळ 7 धावांनीच जिंकता आला. (Sam Curran Has Shades of M S Dhoni said Jos Buttler after India vs England 3rd Odi Pune)

या सामन्यात सॅम करनने सर्वांचे श्वास रोखले होते. सॅम मैदानात आला तोपर्यंत इंग्लंडने मॅच गमावल्याचीच स्थिती होती. मात्र सॅमने 83 चेंडूत 95 धावांची जबरदस्त खेळी करुन, भारताच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. सॅम करन शेवटपर्यंत नाबाद राहिला, मात्र तो इंग्लंडला विजयापर्यंत पोहोचवू शकला नाही .

सॅम करनमध्ये धोनीची झलक 

इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) सॅम करनचं तोंड भरुन कौतुक केलं. त्याला करनमध्ये धोनीची (MS Dhoni) झलक पाहायला मिळाली. बटलर म्हणाला, “सॅम करनने जबरदस्त खेळी केली. भलेही सामना गमावला असला, तरी पुढे हा मोठा अनुभव कामी येईल”

सॅम करनच्या यशामागे धोनीचा हात?

बटलर म्हणाला, “सॅन करनमध्ये धोनीची झलक पाहायला मिळाली. धोनी अशा परिस्थितीत सामना रोमांचिक स्थितीत नेऊन ठेवतो. तसंच सॅम करनने केलं. धोनी एक महान खेळाडू आहे, तर सॅम करनला आयपीएलमध्ये (IPL 14) खूप काही शिकायला मिळालं. आम्हा सर्वांनाच सॅम करनच्या या खेळीमुळे खूप चांगला अनुभव मिळाला. कठीण काळात एकट्याच्या जीवावर पुढे जाता येऊ शकतं, हे सॅमने आपल्या खेळीने दाखवून दिलं”

गोलंदाजीतही कमाल

ऑलराऊंडर सॅम करनने बॅटिंगमध्ये दम दाखवलाच, पण टिच्चून बोलिंगही केली. बॅटिंगमध्ये नाबाद 95 धावा ही सर्वोच्च धावसंख्या करताना, गोलंदाजीत सॅम करनने ऋषभ पंतला (Rishabh Pant) बाद केलं. सॅमने आपण मॅचविनर असल्याचं दाखवून दिलं. त्याने पंतची विकेट घेतली. कसोटी असो की वन डे वा टी ट्वेण्टी , सॅम हा मोठ्या विकेट घेतो. तो ज्या पद्धतीने खेळला, त्याला सलाम आहे, असं बटलरने नमूद केलं.

संबंधित बातम्या 

Virat Kohli | शानदार, जबरदस्त ! इंग्लंडवर 7 धावांनी विजय, कर्णधार विराटचं अनोखं ‘द्विशतक’, मानाच्या पंक्तीत स्थान

IND vs ENG 3rd ODI Live Score : सॅम करनची झुंजार खेळी, थरारक सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय, 2-1 ने मालिका जिंकली