175 चौकार आणि 46 षटकार, 2 फलंदाजांचा झंझावात, 1500 पेक्षा अधिक धावा, तरीही संघात स्थान नाही

इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी (india vs england odi series 2021) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडीक्कल (Devdutt Padikkal) या फलंदाजांनी आपली दावेदारी सिद्ध केली होती. मात्र त्यांना संधी मिळाली नाही.

175 चौकार आणि 46 षटकार, 2 फलंदाजांचा झंझावात, 1500 पेक्षा अधिक धावा, तरीही संघात स्थान नाही
इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी (india vs england odi series 2021) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडीक्कल (Devdutt Padikkal) या फलंदाजांनी आपली दावेदारी सिद्ध केली होती. मात्र त्यांना संधी मिळाली नाही.
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 7:23 PM

पुणे : टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी (india vs england odi series 2021) घोषणा करण्यात आली. यामध्ये एकूण 3 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यामध्ये सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णाचा समावेश आहे. मात्र विजय हजारे स्पर्धेत झंझावती खेळी करुनही मुंबईच्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि कर्नाटकाच्या देवदत्त पडीक्कलला (Devdutt Padikkal) संधी मिळाली नाही. या दोघांनी विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy) शानदार कामगिरी केली होती. या जोरावर दोघांनी एकदिवयीय मालिकेसाठी दावेदारी सिद्ध केली होती. पण त्यांच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. (india vs england odi series 2021 prithvi shaw and devdutt padikkal did not chance)

या दोघांनी विजय हजारे स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. या दोघांनी एकूण 1 हजार 564 धावा चोपल्या. यापैकी पृथ्वीने 827 धावा केल्या तर देवदत्तने एकूण 737 रन्स केल्या.

पृथ्वी शॉ

मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने आपल्या नेतृत्वात विजेतपद मिळवून दिले. तसेच त्याने एकूण 8 सामन्यात सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केली. पृथ्वीने एकूण 8 सामन्यात 165.40 च्या सरासरीने 827 धावांचा रतीब घातला. यामध्ये त्याने 3 शतक आणि 1 द्विशतक झळकावलं. यातील द्विशतक हे पृथ्वीने साखळी फेरीत पुड्डेचरी विरुद्ध लगावलं होतं. तेव्हा पृथ्वीने नाबाद 227 धावांची खेळी केली होती.

यासह पृथ्वी विजय हजारे करंडकातील एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला. मात्र तरीही पृथ्वी शॉवर निवड समितीने विश्वास दाखवला नाही. दरम्यान पृथ्वीने टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

देवदत्त पडीक्कल

कर्नाटकाच्या देवदत्तने या हंगामात पृथ्वीनंतर सर्वाधिक धावा चोपल्या. 20 वर्षीय देवदत्तने 7 सामन्यात 147. 4 च्या सरासरीने 737 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे देवदत्तने हे 4 शतक सलग 4 सामन्यात लगावली. यासह देवदत्तने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने 2008 मध्ये हजारे करंडकात असाच कारनामा केला होता. मात्र अशा चमकदार कामगिरीनंतरही देवदत्तला निवड समितीचं लक्ष वेधून घेता आले नाही.

धवनच्या जागी संधी

पृथ्वी आणि देवदत्त या दोघांपैकी शिखर धवनच्या जागी एकाला संधी देता आली असती. गेल्या काही काळापासून शिखर सातत्याने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. शिखरने विजय हजारे करंडकात 5 सामन्यात 1 शतकासह 203 धावा केल्या होत्या. मात्र यामध्ये तो 2 वेळा शून्यावर बाद झाला होता. सद्य परिस्थितीत टीम इंडियाकडे रोहित शर्मा, शुबमन गिल, शिखर धवन आणि केएल राहुलसारखे 4 सलामीवीर आहेत. त्यामुळे शिखरच्या जागी दोघांपैकी एकाला संधी देता आली असती. पण दुर्देवाने तसे झाले नाही.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

India vs England Odi | विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी आणि देवदत्तची धमाकेदार कामगिरी, इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळणार?

India vs England Odi Series 2021 | इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ गोलंदाजाला संधी

(india vs england odi series 2021 prithvi shaw and devdutt padikkal did not chance)

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.