India vs England | इंग्लंडला पराभवानंतर मोठा धक्का, स्टार खेळाडू मायदेशी परतणार

| Updated on: Feb 27, 2021 | 11:43 AM

4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.

India vs England | इंग्लंडला पराभवानंतर मोठा धक्का, स्टार खेळाडू मायदेशी परतणार
4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडचा तिसऱ्या  कसोटी सामन्यात (India vs Engaland Test Series) पराभव केला. इंग्लंडचा या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर इंग्लंडला आणखी एक जबरदस्त झटका बसला आहे. अखेरच्या चौथ्या कसोटीसाठी संधी न मिळाल्याने अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने (Chris Woakes) मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. (india vs england test series all rounder chris woakes come back home)

इंग्लंड दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि त्यानंतर भारत दौऱ्यावर आली आहे. या तिनही दौऱ्यांमध्ये आतापर्यंत वोक्सला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेतही त्याला खेळवण्यात आले नाही. तर वनडे सीरिज कोरोनामुळे रद्द करण्यात आली होती.

म्हणून वोक्स मायदेशी परतणार..

वोक्सला आधीच संधी मिळाली नाही. तसेच कोरोनामुळे खेळाडूंना बायो बबलमध्ये रहावे लागत आहे. यामुळे खेळाडूंचा वावर हा मैदान ते ड्रेसिंग रुम इथपर्यंतच मर्यादित असतो. पण संधी न मिळाल्याने त्याने परतण्याचा निर्णय घेतला आहे. जेणे करुन बायो बबलच्या वातावरणातून मुक्तता मिळेल. वोक्स प्रमाणे जोस बटलर, सॅम करन आणि मोईन अली यांचाही चौथ्या कसोटीमध्ये समावेश नाही. त्यामुळे हे खेळाडूही मायदेशी परतले आहेत. पण हे खेळाडू टी 20 मालिकेसाठी भारतात परतणार आहेत. या कसोटी मालिकेनंतर उभयसंघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

वनडे सीरिजसाठी वोक्स परतू शकतो

टी 20 मालिकेची सुरुवात 12 मार्चपासून होणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या वनडे सीरिजसाठी वोक्स परतू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हीसी), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या :

India vs England 3rd Test | आधी लाजिरवाणा पराभव, त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉर्ड आणि जेम्स अँडरसनच्या नावे नकोसा विक्रम

VIDEO | Live Interview दरम्यान विराटने अक्षर पटेलला रोखलं, नक्की काय घडलं?

(india vs england test series all rounder chris woakes come back home०