VIDEO | Live Interview दरम्यान विराटने अक्षर पटेलला रोखलं, नक्की काय घडलं?

VIDEO | Live Interview दरम्यान विराटने अक्षर पटेलला रोखलं, नक्की काय घडलं?
विराट कोहलीच्या (Virat kohli) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. लोकल बॉय अक्षर पटेल (Axar Patel) या विजयाचा हिरो ठरला.

विराट कोहलीच्या (Virat kohli) नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. लोकल बॉय अक्षर पटेल (Axar Patel) या विजयाचा हिरो ठरला.

sanjay patil

|

Feb 26, 2021 | 1:38 PM

अहमदाबाद : टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत (India vs England 3 rd Test) 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. इंग्लंडला पराभवासह दुहेरी धक्का बसला. इंग्लंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील (World Test Championship 2021) आव्हान संपुष्टात आले. लोकल बॉय अक्षर पटेल (Axar Patel) या सामन्याचा हिरो ठरला. अक्षरने या सामन्यात दोन्ही डावात मिळून एकूण 11 विकेट्स पटकावल्या. या कामगिरीसाठी अक्षरला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. सामन्यानंतर हार्दिक पंड्याने अक्षरची BCCI Tv साठी मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान कॅप्टन विराटने अक्षरला रोखलं. (Virat Kohli interrupts Akshar Patel Live interview)

नक्की काय झालं?

हार्दिक अक्षरला सामन्यासंबंधात प्रश्न विचारत होता. या मुलाखतीत हार्दिकने सामन्यासंबंधात अनेक प्रश्न विचारले. हार्दिकने यावेळेस अक्षरचं कौतुक केलं. जवळपास दोघांमध्ये साडे चार मिनिटं मुलाखत रंगली. इतक्यात मागून विराट आला. विराट अचानक या इंटरव्यूमध्ये सहभागी झाला. त्याने अक्षरला थांबवलं. विराटने हार्दिककडून माईक घेतला. “रे बाबू थारी बॉलिंग कमाल छे”, असं म्हणत विराटने गुजरातीत अक्षरचं हटके अंदाजात कौतुक केलं. यानंतर अक्षर, विराट आणि हार्दिक जोरजोरात हसू लागले.

“बोलून नाही करुन दाखवणार”

इंग्लंड विरुद्धचा हा तिसरा सामना अक्षरच्या कसोटी कारकिर्दीतील दुसराच सामना ठरला. अक्षरने इंग्लंड विरुद्धच्या चेन्नईतील दुसऱ्या कसोटीतून टेस्ट डेब्यू केलं होतं. अक्षरने या चेन्नई कसोटीतील दुसऱ्या आणि या अहमदाबादमधील तिसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात असं एकूण 3 वेळा 5 विकेट्स घेतल्या. “पुढील सामन्यातही पाच विकेट्स घे”, असं हार्दिक अक्षरला म्हणाला. मी पूर्ण प्रयत्न करणार. “मी फार काही बोलणार नाही. जेव्हा 5 विकेट्स घेईन,तेव्हा बोलेन”, अशी प्रतिक्रिया अक्षरने दिली.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

संबंधित बातम्या :

India vs England 3rd Test | बॅटिंगसाठी खेळपट्टी चांगली होती, पीचबाबत टीका करणाऱ्यांना विराट कोहलीने सुनावलं

28 वर्षांपूर्वी 1 वाजून 51 मिनिटांनी ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांना ‘या’ खेळाडूमुळे ‘जोर का झटका’, नक्की काय घडलं?

(Virat Kohli interrupts Akshar Patel Live interview)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें