AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 वर्षांपूर्वी 1 वाजून 51 मिनिटांनी ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांना ‘या’ खेळाडूमुळे ‘जोर का झटका’, नक्की काय घडलं?

ऑस्ट्रेलियाच्या एलन बॉर्डर (Allan Border) यांनी आजच्याच दिवशी कसोटीमध्ये सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.

28 वर्षांपूर्वी 1 वाजून 51 मिनिटांनी 'लिटील मास्टर' सुनील गावसकर यांना 'या' खेळाडूमुळे 'जोर का झटका', नक्की काय घडलं?
ऑस्ट्रेलियाच्या एलन बॉर्डर (Allan Border) यांनी आजच्यात दिवशी कसोटीमध्ये सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.
| Updated on: Feb 26, 2021 | 11:53 AM
Share

ख्राइस्‍टचर्च : लिटील मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. त्यांनी अनेक किर्तीमानही केलेले आहेत. यामध्ये 34 कसोटी शतकं तसेच 10 हजार कसोटी धावांचा समावेश आहे. पण ख्राईस्टचर्चमध्ये न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आजच्याच दिवशी (New Zealand vs Australia) झालेल्या एका सामन्याने लिटील मास्टर यांना मोठा झटका बसला होता. नक्की असं काय घडलं, ज्यामुळे गावसकरांना मोठा झटका बसला, हे आपण जाणून घेणार आहोत. (australia Allan Border break sunil gavaskar most test run record on this day)

नक्की काय घडलं?

ख्राइस्‍टचर्च न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 25 फेब्रुवारी 1993 मध्ये कसोटी सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी भाग पाडले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसखेर 3 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. जस्टीन लँगर 63 तर स्टीव वॉ 33 धावा करुन मैदानात होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. ऑस्ट्रेलियाची निराशाजनक सुरुवात झाली. लँगर दुसऱ्या दिवशी एकही धाव न करता बाद झाला. तर वॉ 62 धावा करुन माघारी परतला. सेट जोडी बाद झाल्याने कॅप्टन एलन बॉर्डर मैदानात आले. बॉर्डर मैदानात चांगलेच सेट झाले. बॉर्डर यांनी शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

गावसकर यांचा सर्वाधिक कसोटी धावांचा रेकॉर्ड ब्रेक

या दरम्यान न्यूझीलंडचा फिरकीपटू दीपक पटेल गोलंदाजी करण्यासाठी आला. घडाळ्यात दुपारचे 1 वाजून 51 मिनिटं झाली होती. पटेलच्या बोलिंगवर बॉर्डर यांनी पुल करत शानदार चौका लगावला. या चौकारासह बॉर्डर यांनी सुनील गावसकर यांच्या कसोटीतील 10 हजार 122 या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. बॉर्डर कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. बॉर्डर या डावात 88 धावांवर बाद झाले. पण त्यांनी गावसकर यांचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. यानंतर बॉर्डर यांनी पुढील वर्षातच क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. बॉर्डर यांनी कसोटीमध्ये 11 हजार 74 धावा केल्या.

कांगारुंचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 485 धावा केल्या. मार्क टेलरने 82 तर इयान हिलीने 54 धावा केल्या. तर मर्व ह्यूजनेही 45 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून डॅनी मॉरिसन आणि मायकल ओवेन्सने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने प्रत्युतरात पहिल्या डावात 182 धावा केल्या. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात केन रुदरफोर्डने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉर्न आमि क्रेग मॅक्डरमोट या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मर्व आणि पॉल रिफेलने या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना माघारी धाडलं.

न्यूझीलंडला फॉलोऑन

पहिल्या डावात न्यूझीलंडने 182 धावा केल्या. यामुळे कांगारुंनी किवींना फॉलोऑन दिला. फॉलोऑन खेळताना न्यूझीलंडने 243 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर एक डाव आणि 60 धावांनी शानदार विजय मिळवला. दुसऱ्या डावात केन रुदरफोर्डने 102 धावांची शतकी खेळी केली. तर शेन वॉर्न आणि मर्व ह्यूजने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.

संबंधित बातम्या :

84 धावांवर गुंडाळला कांगारुंचा डाव, 8 विकेट्स घेत ‘या’ गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाची उडवली दाणादाण

India vs England 3 rd Test | कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 22 सामने दुसऱ्याच दिवशी निकाली, टीम इंडियाने किती सामने जिंकले?

(australia Allan Border break sunil gavaskar most test run record on this day)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.