AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये बहिष्काराचे वारे, गाैतम गंभीरची खेळाडूंसोबत चर्चा, पाकिस्तानसोबतच्या सामनापूर्वी…

India vs Pakistan Asia Cup 2025 : संपूर्ण जगाचे लक्ष्य असलेला भारत पाकिस्तान क्रिकेट सामना आज दुबईत रंगणार आहे. मात्र, हा सामना सुरू होण्याच्या अगोदर मोठ्या घडामोडींना वेग आलाय. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी खेळाडूंच्या निर्णयाने टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे.

IND vs PAK : भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये बहिष्काराचे वारे, गाैतम गंभीरची खेळाडूंसोबत चर्चा, पाकिस्तानसोबतच्या सामनापूर्वी...
India vs Pakista Match
| Updated on: Sep 14, 2025 | 1:20 PM
Share

आशिया कप 2025 धडाक्यात सुरूवात झाली असून आज दुबईतील स्टेडियममध्ये भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे. मात्र, हा सामना सुरू होण्याच्या काही तास अगोदरच मोठ्या वादाला तोंड फुटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. फक्त हेच नाही तर आज या निर्णयाविरोधात जोरदार निर्देशन होताना दिसत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले. हेच नाही तर स्थिती युद्धापर्यंत जाऊन पोहोचली होती. पहलगाम हल्ल्यात अनेक निर्दाेष लोकांचा जीव गेल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले. हेच नाही तर या भारतीय क्रिकेटर्सचा देखील या सामन्याला विरोध असल्याचा दावा केला जात आहे.

आता या सामन्याच्या काही तास अगोदरच एक धक्कादायक अशी बातमी पुढे येताना दिसतंय. एका इंग्रजी दैनिकात  धक्कादायक रिपोर्ट भारत आणि पाकिस्तान सामन्याचा देण्यात आलाय. रिपोर्टनुसार, भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे वारे वाहत आहे. आता हा मोठा धक्का असणार आहे. मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर यांनी खेळाडू आणि इतर स्टॉपसोबत चर्चा केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात आलंय. 

यासोबतच भारतीय संघातील खेळाडूंना व्यावसायिक राहण्यास सांगण्यात आलंय. इतर सामन्याप्रमाणेच हा सामना खेळण्यास सांगितले असल्याची माहिती मिळतंय.  भारत पाकिस्तान सामना खेळवला जाईल असे वाटले नव्हते असं रायन टेन यांनी म्हटले. भारत पाकिस्तान सामन्याच्या अगोदर भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या रायन टेन यांनी ही प्रतिक्रिया दिली. भारत पाकिस्तान सामना सुरू होण्याच्या अगोदर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

हेच नाही तर भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये थेट बहिष्काराचे वातावरण असताना गंभीर यांनी सर्व खेळाडूंशी चर्चा केली. आता खेळाडू सामन्यावर बहिष्कार टाकणार की, मैदानात पाकिस्तानला धूळ चारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दरवेळीच्या तुलनेत भारत पाकिस्तान सामन्याची तिकिटेही म्हणावी तशी विकली गेली नसल्याने रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय. भारतीय प्रेक्षक हे मोठ्या संख्येने या सामन्याला विरोध करताना दिसत आहेत. 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...