IND vs PAK क्रिकेटचा महामुकाबला रंगणार, भारत फक्त सात खेळाडूंसह मैदानात उतरणार, कुठे, कधी, किती वाजता?

IND vs PAK Match : भारत आणि पाकिस्तान हे दोन्दी संघ लवकरच एकमेकांविरुद्ध सामना खेळणार आहे. आता हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता रंगणार आहे ते पाहा...

IND vs PAK क्रिकेटचा महामुकाबला रंगणार, भारत फक्त सात खेळाडूंसह मैदानात उतरणार, कुठे, कधी, किती वाजता?
| Updated on: Oct 09, 2026 | 3:00 PM

IND vs PAK Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत पाकिस्तान या सामन्यासाठी चाहते भलतेच उत्साही असतात. भारत पाकिस्तान सामना म्हटलं की लोक आर्वजून पाहतात. भारता पाकिस्तान हा सामना खेळापेक्षा वाद विवादांनी भरलेला असतो. आता या दोन कट्टर स्पर्धक पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता रंगणार आहे ते पाहा…

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हाँगकाँग सिक्सेस २०२६ स्पर्धेसाठी आपल्या सात खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद अब्बास आफ्रिदी संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. गतविजेता पाकिस्तान स्पर्धेतील आपला पहिला सामना संयुक्त अरब अमिराती  विरुद्ध खेळेल. त्यानंतर त्याच दिवशी गट ‘क’ मधील दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात त्यांचा सामना भारताशी होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महत्त्वपूर्ण सामना ३० ऑक्टोबर रोजी मोंग कोक येथील मिशन रोड मैदानावर खेळला जाईल.

Loading...

अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची भारतीय संघात निवड झाली आहे. त्याच्यासोबत कृणाल पांड्या आणि नितीश राणा यांसारखे खेळाडूही असतील, जे यापूर्वी भारतासाठी खेळले आहेत. भुवनेश्वरच्या पुनरागमनाची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. तो शेवटचा नोव्हेंबर २०२२ मध्ये भारतासाठी खेळला होता.

सोमवारी ५ ऑक्टोबर हाँगकाँग सिक्स सिरीजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भुवनेश्वर कुमारला भारताचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. या संघात अनुभवी भुवनेश्वरसोबत काही आयपीएल स्टार्सचा समावेश आहे. आता यानंतर भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघातही कमबॅक झाला. न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यांच्या मालिकेत भूवीला स्थान मिळाले आहे.

भुवनेश्वर कुमार (कर्णधार), कृणाल पांड्या, नितीश राणा, शशांक सिंह, टी. नटराजन, राहुल त्रिपाठी आणि राहुल तेवतिया असा संघ असणार आहे. या स्पर्धेसाठी केवळ सात खेळाडूंचा संघ असतो. भारताचे सात आणि पाकिस्तानचे सात खेळाडू आता एकमेकांविरुद्ध लढताना दिसणार आहे. हे खेळाडू 30 ऑक्टोबर रोजी 11:45 वाजता खेळतील. हाँगकाँगमधील टीन काँग रोड रिक्रएशन ग्राउंडवर रंगणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us