
Virat Kohli : कसोटी सामन्यांच्या मालिकेत सपशेल अपयशी ठरल्यानंतर आता भारताची दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी लढत होत आहे. या सामन्यात भारताचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दमादर कामगिरी करून भारताची बाजू भक्कम केली. विराट कोहलीने या सान्यात दमदार असे एकदिवसीय सामन्यांतील 52 वे शतक झळकावले. विराटच्या या कामगिरीचे सध्या देशभरात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे विराटच्या या कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी जी कृती केली, त्याची सगळीकडे चर्चा होत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून अगोदर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचे यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा हे दोन्ही फलंदाज सलामीला आले. यशस्वीज जैस्वाल अवघ्या 18 धावांवर झेलबाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात फलंदाजीसाठी आला. मैदानात पाय ठेवल्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने 120 चेंडूंमध्ये 135 धावांची दमदार अशी शतकी खेळी केली. ही धावसंख्या उभी करताना त्याने 11 चौकार आणि 7 षटकार लगावले. विराट कोहलीच्या याच खेळीमुळे भारताचा धावफलक 349 या आकड्यापर्यंत मजल मारू शकला. विराट कोहलीच्या या कामगिरीचे सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे.
The hug moments of Virat Kohli & Gautam Gambhir in dressing room. ♥️ pic.twitter.com/Be04tt2Yq6
— Tanuj (@ImTanujSingh) November 30, 2025
विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतील 52 वे शतक झळकावले. हे शतक झळकावल्यानंतर विराटच्या आनंदाला पारावार उरला नाही. रोहित शर्मानेदेखील जागेवरून उठून विराट कोहलीचे टाळ्या वाजवत कौतुक केले. गौतम गंभीरनेही विराटची वाहवा केली. विशेष म्हणजे विराट कोहली झेलबाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये गौतम गंभीरने विराटचे विशेष कौतुक केले. गौतम गंभीरने विराटची आनंदाने गळाभेट घेतली. त्याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतिहासात विराट आणि गौतम गंभीर यांचा दोन वेळा वाद झालेला आहे. हो दोघेही क्रिकेटच्या मैदानात एकमेकांसमोर आलेले आहेत. आता मात्र त्यांच्यातील हा वाद पूर्णपणे मिटलेला आहे. विराट आणि गौतम यांची गळाभेट हे त्याचेच उदाहरण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.