घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याने पत्नीला आणि मुलाला दिले तब्बल इतक्या कोटींची गिफ्ट, थेट…

भारताचा स्टार क्रिकेटपट्टू हार्दिक पंड्या हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. हार्दिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत असतो. आता नुकताच हार्दिक पंड्या याने अत्यंत मोठा निर्णय घेतला असून थेट कोट्यावधीचे गिफ्ट दिले.

घटस्फोटानंतर हार्दिक पंड्याने पत्नीला आणि मुलाला दिले तब्बल इतक्या कोटींची गिफ्ट, थेट...
Hardik Pandya
| Updated on: Feb 22, 2026 | 1:36 PM

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नताशा हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा एका हार्दिक पंड्या प्रेमात पडला. तो सतत गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्यासोबत खास वेळ घालवताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेतील खास फोटो माहिका आणि हार्दिकचा पुढे आला. या फोटोमध्ये ते रोमांटिक लूकमध्ये दिसत होते. हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा दोघेही एकमेकांसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करताना दिसतात. मध्यंतरी जोरदार चर्चा रंगताना दिसली की, माहिका आणि हार्दिक पंड्या यांनी लग्न केले. यावेळी एक फोटोही तूफान व्हायरल होत होता. मात्र, तो फोटो पूजेदरम्यानचा होता, लग्नाचा नाही हे स्पष्ट झाले. नताशा हिला काही दिवस डेट करून हार्दिकने लग्न केले, त्यापूर्वीच नताशा ही प्रेग्नंट होती. हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा एक मुलगा असून त्याचे नाव अगस्त्य आहे.

नताशा हिच्यासोबत घटस्फोट घेतला असला तरीही हार्दिक पंड्या आपल्या लेकावर प्रचंड प्रेम करतो. तो कायमच अगस्त्य याच्यासोबतचे फोटोही शेअर करतो. हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा मुलगा 5 वर्षाचा आहे. 2020 मध्ये नताशाने अगस्त्यला जन्म दिला होता. गर्लफ्रेंडचा धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केल्यानंतर हार्दिक पंड्या मुलाला विसरला नाहीये.

हार्दिक पंड्या याचा लेक अगस्त्य 5 वर्षाचा असून या वयातच आपल्या लेकाला कोट्यावधीचे गिफ्ट नुकताच हार्दिक पंड्या याने दिले आहे. फक्त अगस्त्यच नाही तर एक्स पत्नी नताशा हिला देखील त्याने ही कार गिफ्ट दिल्याचे कळतंय. खेळणे खेळण्याच्या वयात हार्दिक पंड्या याने आपल्या लेकाला तब्बल 4 कोटींची गाडी गिफ्ट म्हणून दिली. हार्दिक पंड्या याने मुलाला एसयूवी कार गिफ्ट दिली आहे. सध्या याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अगस्त्य ही कार घेण्यासाठी आई नताशा हिच्यासोबत पोहोचला. यावेळी मागे वेलकम नोट लिहिली असून पापा टू अगस्त्य लिहिल्याचे बघायला मिळतंय. हार्दिक पंड्या याने लेकीला नक्की कोणते मॉडल गिफ्ट केले याबद्दल माहिती मिळू शकली नाही. पण लॅंड रोवर डिफेंडरचे टॉप मॉडल दिल्याचे कळतंय. ज्याची किंमत 4 कोटींच्या आसपास आहे. मुंबईच्या नवनीत मोटर्सकडून ही कार घेतल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us