विराट कोहली याची 2027 च्या वर्ल्डकपपूर्वीच निवृत्ती? थेट मोठे संकेत देत म्हणाला, जर मला माझी..
भारतीय क्रिकेटर विराट कोहली कायमच चर्चेत असलेले नाव आहे. यादरम्यान विराट कोहली याने अत्यंत मोठे संकेत दिले आहेत. त्याने थेट निशाणा साधल्याचे बघायला मिळतंय. विराट कोहली याच्या या विधानाने त्याचे चाहते तणावात आली आहेत.

भारतीय क्रिकेटर विराट कोहली याने नुकताच एक मोठे विधान केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या त्याच्या भविष्याबाबत त्याने हे विधान केले. 2027 च्या पूर्वीच विराट कोहली याने निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. विराट कोहली याच्या या विधानाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. 2027 चा वर्ल्डकप खेळण्याबद्दल स्पष्ट बोलताना दिसला. विराट कोहली याच्या या विधानाने तो 2027 चा वर्ल्डकप खेळणार नसल्याचे संकेत आहे. थोड्यात काय तर त्याच्या पूर्वीच तो निवृत्ती घेऊ शकतो. विराट कोहली याने स्पष्ट शब्दात म्हटले की, त्याला खेळाबद्दल प्रचंड आवड आहे. मात्र, त्याला जर स्वत: ची योग्यता सिद्ध करण्याची वेळ आली तर त्याच्याकरिता ही योग्य जागा नाही. हेच नाही तर विराट कोहली याने म्हटले की, परिस्थिती कशीही असली तरीही तो कोणतीही मालिका खेळण्याकरिता कायमच तयार असेल. मात्र, त्याला त्याची योग्यता सिद्ध करण्याची वेळ येऊ नये.
विराट कोहलीने याने मोठे संकेत दिले. विराट कोहलीने आरसीबी पॉडकास्ट काही गोष्टींवर बोलताना दिसला. विराट कोहली याच्या या पॉडकास्टचा व्हिडीओ फ्रँचायझीच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आला. विराट कोहली सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळतो. त्याने 2024 च्या टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यापूर्वी त्याचा खराब फॉर्म अनेक दिवसांपासून चर्चेचा मुद्दा होता.
गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. आता त्याने थेट वनडे क्रिकेटमधूनही निवृत्तीजे संकेत दिले आहेत. विराट कोहली याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. सोशल मीडियावरही विराट कोहली याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विराट कोहली याचे हे विधान त्याच्या चाहत्यांकरिता धक्कादायक आहे.
विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसोबत लंडनला शिफ्ट झाला. तो भारतात कधी कधी येतो. बऱ्याचदा त्याचे लंडनमधील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. विराट कोहली काही वर्षांपासून जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देताना दिसत आहे. आपल्या दोन्ही मुलांना विराट कोहली याने प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे.