AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युजवेंद्र चहल याच्या आयुष्यात मोठी खळबळ, अगोदर सोडून गेली पत्नी आणि आता थेट..

भारतीय क्रिकेट युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या क्रिकेटपेक्षा अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. आरजे महवश हिच्यासोबत युजवेंद्रचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात आहे.

युजवेंद्र चहल याच्या आयुष्यात मोठी खळबळ, अगोदर सोडून गेली पत्नी आणि आता थेट..
Yuzvendra Chahal
| Updated on: Jan 27, 2026 | 5:19 PM
Share

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. युजवेंद्र चहल याने 2025 मध्ये पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोघे विभक्त झाले. घटस्फोटाच्या अगोदर 18 महिन्यांपासून आम्ही विभक्त राहत असल्याचा खुलासा धनश्री वर्मा आणि युजवेंद्रने कोर्टात केला. धनश्री वर्मा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचे नाव आरजे महवश हिच्यासोबत जोडले जात होते. दोघे अनेकदा स्पॉट होतानाही दिसले. लंडनमध्ये काही दिवसांपूर्वीच खास वेळ दोघे घालवत होते. हेच नाही तर युजवेंद्र चहल हा आरजे महवश हिच्यासोबत लग्न करणार असल्याचेही सांगितले जात होते. धनश्री वर्मा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर स्टेडियममध्येही युजवेंद्र चहल आरजे महवश हिच्यासोबत स्पॉट झाला. मात्र, अचानक दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले.

फक्त अनफॉलोच नाही तर आरजे महवश हिने युजवेंद्र चहल याच्याबद्दल पोस्ट शेअर करत काही गंभीर आरोप केले. यादरम्यान युजवेंद्र चहल हा अभिनेत्री आणि बिग बॉस फेम शेफाली बग्गा हिच्यासोबत स्पॉट झाला. यानंतर एकच चर्चा रंगताना दिसली की, युजवेंद्र चहल हा शेफाली बग्गा हिला डेट करत आहे. शेफाली बग्गासोबत युजवेंद्र चहल आनंदी देखील दिसल्या.

यादरम्यान युजवेंद्र चहल याने अजून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. युजवेंद्र चहल याने शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहिले की, विषय कधी वेळेचा नसतो तर तो प्राथमिकतेचा असतो. जर एखादी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असते तर त्याकरिता तुम्ही वेळ काढता. युजवेंद्र चहल याच्या या पोस्ट पाहून लोक अंदाजा लावत आहेत की, त्याच्या खासगी आयुष्यात बरेच काही सुरू आहे.

Yuzvendra Chahal

आरजे महवश हिच्यासाठीच या पोस्ट युजवेंद्र चहल पोस्ट करत असल्याचे सांगितले जात आहे. आरजे महवश आणि युजवेंद्र चहल यांच्या नात्यात दुरावा नेमका का आला? हे कळू शकले नाही. पण काही दिवसांपूर्वीच युजवेंद्र चहल हा एक्स पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबत स्पॉट झाला होता.

अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.