मैदानावर उतरणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू, पालघरच्या पठ्ठ्याचा सराव सुरु

| Updated on: May 23, 2020 | 8:08 PM

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर अखेर मैदानात (Shardul Thakur began outdoor practice) उतरला आहे. त्याने सरावाला सुरुवात केली.

मैदानावर उतरणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू, पालघरच्या पठ्ठ्याचा सराव सुरु
Follow us on

पालघर : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर अखेर मैदानात (Shardul Thakur began outdoor practice) उतरला आहे. शार्दूलने पालघरमध्ये सरावाला सुरुवात केली. शार्दूल ठाकूर, मुंबई रणजी संघातील खेळाडू हार्दिक तामोरे तसेच युवा क्रिकेटपटू साईराज पाटील यांनी आज बोईसर येथील पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स क्लब मैदानावर सराव केला. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या या काळात सराव बंद होता. मात्र शार्दूल ठाकूरने सोशल डिस्टन्सिंग ठेवत सराव सुरु केला. (Shardul Thakur began outdoor practice)

शार्दूल ठाकूर मूळचा पालघर जिल्ह्याचा रहिवासी आहे. पालघर जिल्ह्यातील काही भाग जसे वसई, विरारमध्ये कोरोनाच कहर आहे. मात्र त्याव्यतिरिक्त अन्य भागात कोरोना रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. महाराष्ट्राची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी विभागणी केली आहे. त्यामध्ये पालघर जिल्हा बिगर रेड झोनमध्ये येतो. बिगर रेड झोनमध्ये प्रेक्षकांशिवाय मैदाने खुली करण्यास परवानगी आहे, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनने सांगितलं.

वाचा : विराट मराठीत म्हणाला, “तुला मानला रे ठाकूर”!

दरम्यान, शार्दूल ठाकूर हा सराव सत्र सुरु करणारा बीसीसीआयचा पहिला करारबद्ध खेळाडू ठरला आहे. शार्दूल ठाकूरने भारताकडून 1 कसोटी, 11 वन डे आणि 15 टी 20 सामने खेळले आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शार्दूल म्हणाला, “आज मी सरावाला सुरुवात केली. दोन महिन्यांनी सरावाची संधी मिळाली. आजच्या सरावाने बरं वाटलं”

संबंधित बातम्या 

 विराट मराठीत म्हणाला, “तुला मानला रे ठाकूर”!

महाराष्ट्राची रेड झोन आणि बिगर रेड झोनमध्ये विभागणी, रेड झोनमध्ये काय सुरु राहणार?