विराट मराठीत म्हणाला, “तुला मानला रे ठाकूर”!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात, पालघरच्या शार्दूल ठाकूरने (Virat Kohli Shardul Thakur Marathi) निर्णायक खेळी केली.

विराट मराठीत म्हणाला, “तुला मानला रे ठाकूर”!

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात, पालघरच्या शार्दूल ठाकूरने (Virat Kohli Shardul Thakur Marathi) निर्णायक खेळी केली. शार्दूलने अवघ्या 6 चेंडूत 17 धावा ठोकल्याने, अवघड वाटणारा हा सामना भारताने 4 विकेट्स आणि 1 ओव्हर राखून सहज जिंकला. या विजयामुळे भारतने वेस्ट इंडिजविरुद्धची वन डे मालिका 2-1 ने खिशात घातली. या विजयानंतर मराठमोळ्या शार्दूल ठाकूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने तर शार्दूलचं अस्सल मराठीत (Virat Kohli Shardul Thakur Marathi) कौतुक केलं. कोहलीने या विजयानंतर मराठीत ट्विट करत, “तुला मानला रे ठाकूर” असं म्हटलं आहे.

विराटच्या या ट्विटनंतर लाईक्स आणि रिट्विटचा पाऊस पडत आहे. मात्र विराटला हे ट्विट मराठीत कुणी सांगितलं याबाबत उत्सुकता सर्वांना आहे.

सध्याच्या टीम इंडियात केदार जाधव, रोहित शर्मा यांना मराठी येतं. याशिवाय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही मराठी समजतं. त्यामुळे यापैकी कुणी विराट कोहलीला मराठीत भाषांतर करुन दिलं की काय, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे.

मात्र विराटने कोणाकडूनही भाषांतर करुन घेतलं असलं, तरी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याचं भरभरुन कौतुक महाराष्ट्र आणि मराठी माणसांतून होत आहे.

भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

दरम्यान, कटक इथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम वन डे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 4 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारताला 316 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी शतकी सलामी दिली. रोहित शर्माने 63 तर राहुलने 77 धावा केल्या. या विजयात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावली. कोहलीने 85 धावा केल्या. तर रवींद्र जाडेजाने शार्दूल ठाकूरला हाताशी घेऊन भारताला विजय मिळवून दिला. जाडेजाने नाबाद 39 तर शार्दूल ठाकूरने गरजेच्या वेळी धडाकेबाज खेळी करत 6 चेंडूत 17 धावा ठोकल्या.

संबंधित बातम्या  

रोहित शर्माने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *