Lakshya Sen चा इंडोनेशिया मास्टर्स 2022 स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभव

भारताच्या लक्ष्य सेनचं (Lakshya Sen) इंडोनेशिया मास्टर्स 2022 स्पर्धेच्या (Indonesia Masters 2022) क्वार्टर फायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलय.

Lakshya Sen चा इंडोनेशिया मास्टर्स 2022 स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये पराभव
Lakshya Sen
Image Credit source: BAI
| Updated on: Jun 10, 2022 | 4:54 PM

मुंबई: भारताच्या लक्ष्य सेनचं (Lakshya Sen) इंडोनेशिया मास्टर्स 2022 स्पर्धेच्या (Indonesia Masters 2022) क्वार्टर फायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलय. तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात तैवानच्या चो-टिएन-चेनने (Chou Tien-chen) लक्ष्यचा पराभव केला. एक तास दोन मिनिटं हा सामना चालला. जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य सेनला चांगली सुरुवात मिळाली नाही. 32 वर्षाच्या चो-टिएन-चेनने आघाडी घेतली होती. चो-टिएन-चेनकडे 11-9 अशी आघाडी होती. सेनने पहिला गेम 16-21 असा गमावला.

सेनने दुसऱ्या गेमवर वर्चस्व गाजवलं

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडल मिळवणाऱ्या लक्ष्य सेनने दुसऱ्या गेमवर वर्चस्व गाजवलं. 11-5 अशी मोठी आघाडी त्याने घेतली होती. 21-12 अशा मोठ्या फरकाने लक्ष्य सेनने दुसरा गेम घेतला. त्याने तैवानच्या प्रतिस्पर्ध्याला फार संधी दिली नाही. त्यानंतर सामना तिसऱ्या गेममध्ये पोहोचला.

पुनरामगन करु शकला नाही

तिसऱ्या निर्णायक गेममध्ये चो-टिएन-चेनने 3-0 अशी आघाडी घेतली. टिएन-चेनने ही आघाडी पुढे 11-5 अशी वाढवली. लक्ष्य सामन्यात पुनरामगन करु शकला नाही. त्याने तिसरा गेम 14-21 असा गमावला.