IPL: संजू सॅमसनचं घणाघाती शतक, तरीही राजस्थानचा पराभव

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

RRvsSRH हैदराबाद: आयपीएलच्या आठव्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या राजस्थान रॉयल्सवर केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबादने 5 विकेट्स राखून मात केली. नाणेफेक जिंकून राजस्थानने संजू सॅमसनच्या घणाघाती शतकाच्या जोरावर 198 धावा केल्या होत्या. मात्र हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरच्या 69 धावांच्या खेळीने संजूची नाबाद 102 धावांची खेळी वाया गेली. हैदराबादने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 19 षटकात 201 धावा करुन सोपा विजय […]

IPL: संजू सॅमसनचं घणाघाती शतक, तरीही राजस्थानचा पराभव
Follow us on

RRvsSRH हैदराबाद: आयपीएलच्या आठव्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या राजस्थान रॉयल्सवर केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबादने 5 विकेट्स राखून मात केली. नाणेफेक जिंकून राजस्थानने संजू सॅमसनच्या घणाघाती शतकाच्या जोरावर 198 धावा केल्या होत्या. मात्र हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरच्या 69 धावांच्या खेळीने संजूची नाबाद 102 धावांची खेळी वाया गेली. हैदराबादने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 19 षटकात 201 धावा करुन सोपा विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने 49 चेंडूत 70 तर संजू सॅमसनने 55 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 102 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानने निर्धारित 20 षटकात 2 बाद 198 धावा केल्या.

राजस्थानचं हे आव्हान मैदानात उतरलेल्या हैदराबादच्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 37 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 69 धावा केल्या. तर जॉनी बेयस्ट्रो 45, विजय शंकरने 35 धावा करुन हैदराबादच्या विजयात हातभार लावला.

यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या शतकाचा मान राजस्थानच्या संजू सॅमसनला मिळालं. 24 वर्षीय संजूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 2 शतकं ठोकली आहेत. कालच्या सामन्यातील त्याचं हे दुसरं शतक ठरलं. त्याआधी 2017 मध्ये संजूने दिल्ली डेयरडेव्हिल्सकडून खेळताना रायजिंग पुणेविरुद्ध 102 धावा केल्या होत्या.

दरम्यान, कालच्या सामन्यात संजूने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या 20 चेंडूत 50 धावा ठोकून शतक पूर्ण केलं. त्याने भुवनेश्वर कुमारच्या एकाच षटकात 24 धावा कुटल्या.