मुंबईचे हे 2 गोलंदाज ‘खतरो के खिलाडी’, दिल्लीला धोका, मुंबईचे सपोर्टर्स म्हणतात ‘बच के रहेना’!

मुंबईच्या दोन प्रमुख गोलंदाजांची दिल्लीच्या फलंदाजांना चिंता लागून राहिली आहे.

मुंबईचे हे 2 गोलंदाज 'खतरो के खिलाडी', दिल्लीला धोका, मुंबईचे सपोर्टर्स म्हणतात 'बच के रहेना'!
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 4:13 PM

दुबई : आयपीएलच्या 2020 (IPL 2020) च्या हंगामातील आज अंतिम लढत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (delhi Capital) यांच्यात पार पडणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडवर हा रोमहर्षक सामना पार पडणार आहे. दोन्ही संघांचे प्लेअर तुफान फॉर्ममध्ये आहेत. मात्र मुंबईच्या दोन प्रमुख गोलंदाजांची दिल्लीच्या फलंदाजांना चिंता लागून राहिली आहे. जसप्रीत बुमराह (jasprit Bumrah) आणि ट्रेंट बोल्टने (Trent bolt) आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी टीमचं कंबरडं मोडलंय. सामन्याच्या सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये विरोधी टीमला धक्के देऊन मॅचवर कब्जा मिळवण्यात बुमराह आणि बोल्ट निष्णात आहेत. (ipl 2020 final mi vs dc Jasprit Bumrah and Trent Bolt best Performance IPL 2020)

ट्रेन्ट बोल्टला यापूर्वीच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे मुंबईचा संघ काळजीत पडला होता. मात्र अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याने नेट्समध्ये कसून सराव करत फिट असल्याचं सांगितलं. एकूणच तो दुखापतीतून सावरला आहे. ट्रेन्टला दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर 1 सामन्यादरम्यान ग्रोईन इंज्युरीचा त्रास झाला होता. ट्रेन्ट बोल्ट नेट्समध्ये कसून सराव करताना दिसत आहे. त्याच्या या नेट्स प्रॅक्टीसचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करण्यात आला आहे.

ट्रेन्टने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे तो फायलन खेळण्यासाठी तयार झाला आहे, हे जवळपास निश्चित झालं आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेन्ट रोहित शर्मासह इतर फलंदाजांविरुद्ध बोलिंग करताना पाहायला मिळत आहे. ट्रेन्टच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. 14 व्या ओव्हरमध्ये त्याला त्रास जाणवू लागला. यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. दुखापतीमुळे बोल्टला आपल्या कोट्यातील सर्व ओव्हर टाकता आल्या नव्हत्या. बोल्टने या सामन्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट्सह मेडन ओव्हर टाकली होती. बोल्टने या सामन्यात एकूण 2 ओव्हर टाकल्या होत्या. दरम्यान आता ट्रेन्ट दुखापतीतून सावरल्याने मुंबईच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

बुमराह बोल्टची कमाल

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ट्रेन्ट बोल्ट ही जोडी आयपीएलच्या 13 व्या मोसमात दमदार कामगिरी करत आहेत. या दोघांनी आतापर्यंत या मोसमात एकूण 49 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये बुमराहच्या नावावर 27 तर बोल्टच्या नावावर 22 विकेट्सची नोंद आहे. बोल्टने केलेल्या कामगिरीसाठी त्याला या मोसमात 2 वेळा सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

दरम्यान मुंबईची अंतिम सामन्यात पोहचण्याची सहावी तर दिल्लीची पहिलीच वेळ आहे. मुंबईने याआधी 4 वेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यावेळेसही दिल्लीवर मात करण्याचा मानस मुंबईचा असणार आहे. तर मुंबईला पराभूत करत ट्रॉफी उंचावण्याचा प्रयत्न दिल्लीच्या टीमचा असेल.

(ipl 2020 final mi vs dc Jasprit Bumrah and Trent Bolt best Performance IPL 2020)

संबंधित बातम्या :

Photo | MI Vs DC आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईचं पारडं जड करणाऱ्या 5 गोष्टी

IPL FINAL 2020, MI vs DC : पर्पल कॅपसाठी कगिसो रबाडा आणि जसप्रीत बुमराहमध्ये कडवी झुंज

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.