IPL 2020 | सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नईपेक्षा रोहितची मुंबई भारी, गौतम गंभीरला विश्वास

| Updated on: Sep 17, 2020 | 3:06 PM

आयपीएलच्या 13 व्या हंगामाला येत्या 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्ये सुरुवात होणार आहे.

IPL 2020 | सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नईपेक्षा रोहितची मुंबई भारी, गौतम गंभीरला विश्वास
Follow us on

यूएई : आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. “सलामीच्या सामन्यात रोहित शर्माची मुंबई इंडियन्स महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जवर वरचढ ठरेल.” असा विश्वास टीम इंडियाच्या माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केला. आयपीएलच्या 13 व्या हंगामाला येत्या 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. (Gautam gambhir on mumbai indians vs chennai super king)

गंभीर काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेण्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांचा सामना करणं चेन्नई सुपर किंग्ज यांच्यासाठी कठीण असेल. चेन्नईच्या संघात सुरेश रैनाचीही अनुपस्थिती चिंतेचा विषय असेल, असं गौतम गंभीर म्हणाला.

बुमराह आणि बोल्ट हे दोघे नव्या चेंडूने कशाप्रकारे गोलंदाजी करतात, हे पाहण्यासाठी आतूर असल्याचंही गंभीर म्हणाला. बुमराह आणि बोल्ट आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोलंदाज आहेत. तसेच दोघे टी 20 प्रकारात विकेट घेण्यात निपुण आहेत. न्यूझीलंडचा डावखुरा गोलंदाज बोल्ट हा उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी डोकेदुखी ठरु शकतो. चेंडू स्विंग करणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. बुमराहचीही वेगळी शैली चेन्नईसाठी चिंतेची बाब असेल, असं गंभीरने नमूद केलं.

रैनाने आयपीएलच्या 13 व्या हंगामातून वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. त्यामुळे रैनाच्या जागी तिसऱ्या क्रमांकाची उणीव भरुन काढणं, हे चेन्नईसाठी आव्हानात्मक असल्याचं गंभीर म्हणाला. दुसरीकडे चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसन गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे शेन वॉटसनसोबत दुसरा कोणता खेळाडू सलामीला उतरेल आणि ही जोडी मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना कशी करेल, हे पाहणं औत्सुक्याचं असेल, असं गंभीरने सांगितलं.

दरम्यान चेन्नईपाठी लागलेले शुक्लकाष्ठ थांबण्याचं नाव घेत नाही. रैना आणि हरभजन या दोघांनी यंदाच्या मौसमातून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली. त्यापाठोपाठ फलंदाज ऋतुराज गायकवाडला अद्याप काही दिवस विलगीकरणात रहावं लागणार आहे. यामुळे सलामीच्या सामन्याला तो मुकणार आहे. त्यामुळे चेन्नईसाठी हा आणखी एक फटका आहे. (Gautam gambhir on mumbai indians vs chennai super king)

संबंधित बातमी :

IPL 2020 | चेन्नईचा ऋतुराज गायकवाड आयसोलेशनमध्येच, मुंबईविरुद्ध सामन्यात अनुपस्थितीची चिन्हं

सुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद