IPL 2020, KKR vs DC : कोलकाताचा दिल्लीवर 59 धावांनी दमदार विजय

दिल्लीविरुद्धच्या या विजयासह कोलकाता पॉइंट्सटेबलमध्ये 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

IPL 2020, KKR vs DC : कोलकाताचा दिल्लीवर 59 धावांनी दमदार विजय

अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर 59 धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 135 धावाच करता आल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 27 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही फंलदाजाला दुहेरी धावा करता आल्या नाही. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने 3 विकेट्स घेतल्या. तसेच लॉकी फॅर्ग्युसनने 1 विकेट घेतला.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची खराब सुरुवात राहिली. पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणे आऊट झाला. त्यानंतर दिल्लीचा 13 स्कोअर असताना शिखर धवन बाद झाला. यानंतर तिसऱ्या विकेटसाठी ऋषभ पंत आणि लोकेश राहुल या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर ऋषभ पंत 27 धावांवर बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर दिल्लीने 95 धावांवर पाठोपाठ 2 विकेट्स गमावल्या. शिमरॉन हेटमायर 10 तर कर्णधार लोकेश राहुल 47 धावांवर आऊट झाला. यानंतर दिल्लीने विकेट गमावल्या. यानंतर कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले. कोलकाताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. कोलकाताकडून नितीश राणाने 81 तर सुनील नारायणने 64 धावांची धमाकेदार खेळी केली. दिल्लीकडून एनरिच नोर्तजे, कगिसो रबाडा आणि मार्कस स्टोयनिस या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाताची फार चांगली सुरुवात राहिली नाही. कोलकाताने आपल्या पहिल्या 3 विकेट्स ठराविक अंतराने गमावल्या. कोलकाताने 11 धावांवर पहिली, 35 धावांवर दुसरी आणि 42 धावांवर तिसरी विकेट गमावली. शुभमन गिलने 9, राहुल त्रिपाठीने 13 तर दिनेश कार्तिकने 3 धावा केल्या.

कोलकाताची 7.2 ओव्हरमध्ये 42-3 अशी अवस्था झाली. यानंतर सुनील नारायण आणि नितीश राणा या दोघांनी कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 115 धावांची धमाकेदार पार्टनरशीप केली. यादरम्यान या दोन्ही खेळाडूंनी आपले अर्धशतक पूर्ण केलं. ही जोडी तोडायला रबाडाला यश आले. त्याने सुनील नारायणला बाद केले. नारायणने 32 चेंडूत 64 धावा केल्या. याखेळीत त्याने 4 सिक्स आणि 6 फोर लगावले.

यानंतर मोर्गन मैदानात आला. नितीश राणाने यानंतर फटकेबाजी केली. मात्र तोही आऊट झाला. राणाला मार्कस स्टोयनिसने बाद केले. नितीशने 53 चेंडूत 81 धावा केल्या. यामध्ये त्याने 13 फोर मारले तर 1 सिक्सही लगावला. कर्णधार इयोन मॉर्गनने 17 धावा केल्या.

IPL 2020 KKR vs DC Live Score Update Today Cricket Match Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live लाईव्ह स्कोअरकार्ड

Picture

कोलकाताचा दिल्लीवर दमदार विजय

24/10/2020,7:11PM
Picture

दिल्ली नववा धक्का

24/10/2020,7:09PM
Picture

दिल्लीला आठवा धक्का

24/10/2020,7:03PM
Picture

दिल्लीला सातवा धक्का

24/10/2020,6:51PM
Picture

दिल्लीला सहावा धक्का

24/10/2020,6:46PM
Picture

दिल्लीला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 85 धावांची आवश्यकता

24/10/2020,6:45PM
Picture

दिल्लीला पाचवा धक्का

24/10/2020,6:39PM
Picture

दिल्लीला चौथा धक्का

24/10/2020,6:36PM
Picture

दिल्लीला तिसरा धक्का

24/10/2020,6:26PM
Picture

दिल्लीचा डाव सावरला

24/10/2020,6:19PM
Picture

8 ओव्हरनंतर दिल्ली

24/10/2020,6:10PM
Picture

दिल्ली 4 ओव्हरनंतर

24/10/2020,5:49PM
Picture

दिल्लीला दुसरा धक्का

24/10/2020,5:42PM
Picture

दिल्लीची खराब सुरुवात

24/10/2020,5:30PM
Picture

दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात

24/10/2020,5:28PM
Picture

दिल्लीला विजयासाठी 195 धावांचे आव्हान

24/10/2020,5:15PM
Picture

कोलकाताला सहावा धक्का

24/10/2020,5:13PM
Picture

कोलकाताला पाचवा धक्का

24/10/2020,5:13PM
Picture

कोलकाता 18 ओव्हरनंतर

24/10/2020,5:04PM
Picture

कोलकाताला चौथा धक्का

24/10/2020,4:57PM
Picture

कोलकाता 16 ओव्हरनंतर

24/10/2020,4:52PM
Picture

चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

24/10/2020,4:48PM
Picture

सुनील नारायणचे दमदार अर्धशतक

24/10/2020,4:44PM
Picture

नितीश राणाचे अर्धशतक

24/10/2020,4:40PM
Picture

12 ओव्हरनंतर कोलकाता

24/10/2020,4:33PM
Picture

चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

24/10/2020,4:31PM
Picture

कोलकाता 10 ओव्हरनंतर

24/10/2020,4:23PM
Picture

9 ओव्हरनंतर कोलकाता

24/10/2020,4:19PM
Picture

कोलकाताला तिसरा धक्का

24/10/2020,4:09PM
Picture

पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर कोलकाता

24/10/2020,4:03PM
Picture

कोलकाताला दुसरा धक्का

24/10/2020,3:59PM
Picture

4 ओव्हरनंतर कोलकाता

24/10/2020,3:52PM
Picture

कोलकाताचा 3 ओव्हरनंतर स्कोअर

24/10/2020,3:47PM
Picture

कोलकाताला पहिला धक्का

24/10/2020,3:43PM
Picture

कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात

24/10/2020,3:42PM
Picture

दिल्लीची टीम

24/10/2020,3:08PM
Picture

कोलकाता प्लेइंग इलेव्हन

24/10/2020,3:07PM
Picture

दिल्लीने टॉस जिंकला

24/10/2020,3:02PM

प्लेऑफसाठीचे आव्हान कायम ठेवण्यासाठी कोलकाताला या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असणार आहे. तर दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी केवळ 1 विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे या सामन्यात नक्की कोण जिंकणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

आमनेसामने

आयपीएलमध्ये कोलकाता आणि दिल्ली आतापर्यंत एकूण 24 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 24 पैकी 13 सामन्यात कोलकाताचा विजय झाला आहे. तर दिल्लीलाही 11 सामने जिंकण्यास यश आले आहे. या दोन्ही संघात 2019 मध्ये आयपीएलमधील सामना खेळण्यात आला होता. हा सामना बरोबरीत सुटला होता. तेव्हा दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये कोलकातावर मात केली होती.

या मोसमात याआधी हे दोन्ही संघ 3 ऑक्टोबरला भिडले होते. या सामन्यात दिल्लीचा 18 धावांनी विजय झाला होता. दिल्लीने प्रथम बॅटिंग करत कोलकाताला विजयासाठी 229 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावून 210 धावाच करता आल्या. पॉइंट्सटेबलमध्ये दिल्ली 14 गुणांसह 2 ऱ्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता 10 गुणांसह 4 थ्या क्रमांकावर आहे.

कोलकाता नाईट राइडर्स : इयोन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन , पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, टॉम बँटन, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, रिंकू सिंह, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, संदीप लामिछाने, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, अमित मिश्रा, एनरिच नोर्तजे आणि डॅनियल सॅम्स.

संबंधित बातम्या :

IPL 2020, DC vs KKR : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा विजय, कोलकातावर 18 धावांनी मात

IPL 2020 KKR vs DC Live Score Update Today Cricket Match Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Live

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *