IPL 2020, DC vs KKR : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा विजय, कोलकातावर 18 धावांनी मात

नाबाद 88 धावा करणारा दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर ठरला सामनावीर पुरस्काराचा मानकरी. (Delhi Capitals Beat Kolkata Knight Riders By 18 Runs)

IPL 2020, DC vs KKR : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा विजय, कोलकातावर 18 धावांनी मात

शारजा : अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने कॅपिटल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 18 धावांनी मात केली आहे. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी 229 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 210 धावाच करता आल्या. कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर इयन मॉर्गनने 44 धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने 3 विकेट्स घेतल्या. (Delhi Capitals Beat Kolkata Knight Riders By 18 Runs )

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. कोलकाताने 8 धावांवर पहिली विकेट गमावली. सुनील नारायण 3 धावांवर आऊट झाला. यानंतर शुभमन गिल आणि नितीश राणाने दुसऱ्या विकेटसाठी 64 धावा जोडल्या. युवा शुभमन गिल 28 धावावर आऊट झाला.

गिलनंतर आंद्रे रसेल मैदानात आला. मात्र दोन मोठे फटके मारल्यानंतर रसेल बाद झाला. चांगली खेळी करत असलेला नितीश राणा 13 व्या ओव्हरमध्ये 58 धावांवर आऊट झाला. यामागोमाग कर्णधार दिनेश कार्तिक बाद झाला. यामुळे कोलकाताची 117-5 अशी परिस्थिती झाली. या धक्क्यातून सावरण्याआधी पॅट कमिन्सच्या रुपात कोलकाताला सहावा धक्का लागला.

कोलकाताचा गडगडलेला डाव राहुल त्रिपाठी आणि इयन मॉर्गन या जोडीनी सावरला. या दोघांनी कोलकाताला सामन्यात बनवून ठेवलं. या दोघांनी सावध सुरुवात करत जोरदार फटकेबाजी केली. सामना रंगतदार स्थितीत आणला. या जोडीने कोलकाताला 122-6 वरुन 200 पर्यंत आणले. मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात इयन मॉर्गन कॅचआऊट झाला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. मॉर्गनने धमाकेदार 18 चेंडूत 5 सिक्सच्या मदतीने 44 धावा केल्या.

मॉर्गन बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यात यश आले नाही. राहुल त्रिपाठीही बाद झाला. त्याने 16 चेंडूत 36 धावांची शानदार खेळी केली. दिल्लीकडून एनरिच नोर्तजेने 3 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलने 2 विकेट्स घेतल्या.

त्याआधी कोलकाताने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने पावर प्लेमध्ये मोठे फटके लगावले.

या जोडीने पहिल्या विकेटसाठी 56 धावा जोडल्या. यानंतर शिखर धवन 26 धावांवर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला. अय्यर-शॉ जोडीने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दरम्यान पृथ्वी शॉने आपले अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी 73 धावांची जोरदार भागीदारी केली. यानंतर दिल्लीला 129 धावांवर दुसरा धक्का लागला. पृथ्वी शॉ 66 धावांवर आऊट झाला.

शॉ बाद झाल्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला. पंतने मैदानात येताच फटकेबाजीला सुरुवात केली. पंत आणि अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 72 धावा जोडल्या. या भागीदारीदरम्यान पंतने जोरदार फटके लगावले. पंतने 17 चेंडूत 1 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 38 धावा केल्या.

पंत बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने कोलकातावर हल्ला चढवला. शेवटच्या काही ओव्हरमध्ये त्याने काही फटके लगावले. श्रेयस अय्यरने दिल्लीकडून सर्वाधिक नाबाद 88 धावा केल्या. याखेळीत त्याने 6 सिक्स आणि 7 फोर लगावले. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 2 तर वरुन चक्रवर्थी आणि कमलेश नागरकोटी या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Delhi Capitals Beat Kolkata Knight Riders By 18 Runs )

[svt-event title=”दिल्लीची कोलाकातावर 18 धावांनी मात” date=”03/10/2020,11:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताची आठवी विकेट” date=”03/10/2020,11:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 26 धावांची आवश्यकता” date=”03/10/2020,11:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 6 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता” date=”03/10/2020,11:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला सातवा धक्का” date=”03/10/2020,11:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या 200 धावा पूर्ण” date=”03/10/2020,11:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सामना रंगतदार स्थितीत. कोलकाताला विजयासाठी 31 धावांची आवश्यकता” date=”03/10/2020,11:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 18 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,11:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताने 17 व्या ओव्हरमध्ये 24 धावा कुटल्या” date=”03/10/2020,11:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयसाठी 4 ओव्हरमध्ये 78 धावांची आवश्यकता” date=”03/10/2020,11:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या 150 धावा पूर्ण” date=”03/10/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 30 चेंडूत 92 धावांची आवश्यकता” date=”03/10/2020,11:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 14 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,11:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला सहावा दणका, कोलकाता अडचणीत” date=”03/10/2020,11:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला 2 बोलवर 2 झटके” date=”03/10/2020,10:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला चौथा धक्का” date=”03/10/2020,10:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 8 ओव्हरमध्ये 121 धावांची आवश्यकता” date=”03/10/2020,10:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नितीश राणाच्या 50 धावा” date=”03/10/2020,10:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या 100 धावा पूर्ण” date=”03/10/2020,10:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये 135 धावांची आवश्यकता” date=”03/10/2020,10:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताची तिसरी विकेट” date=”03/10/2020,10:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”9 ओव्हरनंतर कोलाकाताच्या धावा” date=”03/10/2020,10:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शुभमन गिल आऊट, कोलकाताला दुसरा धक्का” date=”03/10/2020,10:19PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाचा चांगल्या स्थितीत” date=”03/10/2020,10:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 7 षटकांनंतर” date=”03/10/2020,10:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये कोलकाताच्या 59 धावा” date=”03/10/2020,10:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी नितीश राणा-शुभमन गिल जोडीची अर्धशतकी भागीदारी” date=”03/10/2020,10:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शुभमन गिल-नितीश राणाने डाव सावरला” date=”03/10/2020,10:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 4 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,9:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”3 ओव्हरनंतर कोलाकाताच्या धावा” date=”03/10/2020,9:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 2 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,9:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला पहिला धक्का” date=”03/10/2020,9:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकात्याच्या डावाला सुरुवात” date=”03/10/2020,9:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

लाईव्ह स्कोअर

[svt-event title=”कोलकाताला विजयासाठी 229 धावांचे आव्हान ” date=”03/10/2020,9:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला चौथा धक्का” date=”03/10/2020,9:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्णधार श्रेयस अय्यरची फटकेबाजी” date=”03/10/2020,9:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 18 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,9:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीला तिसरा धक्का, ऋषभ पंत बाद” date=”03/10/2020,9:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 200 धावा” date=”03/10/2020,9:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 17 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,9:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर-ऋषभ पंत यांच्यात अर्धशतकी भागीदारी” date=”03/10/2020,9:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पंत-अय्यरची फटकेबाजी” date=”03/10/2020,8:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”श्रेयस अय्यरचे अर्धशतक” date=”03/10/2020,8:57PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 15 षटकानंतर” date=”03/10/2020,8:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 150 धावा ” date=”03/10/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा 14 ओव्हरनंतर स्कोअर” date=”03/10/2020,8:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 13 ओव्हरनंतर, श्रेयस अय्यर-ऋषभ पंत मैदानात” date=”03/10/2020,8:39PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”दिल्लीला दुसरा धक्का” date=”03/10/2020,8:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”श्रेयस-पृथ्वीची फटकेबाजी, दिल्ली 12 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,8:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”03/10/2020,8:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 11 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 100 धावा” date=”03/10/2020,8:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पृथ्वीचे अर्धशतक पूर्ण” date=”03/10/2020,8:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 10 ओव्हरनंतर धावा” date=”03/10/2020,8:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 9 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,8:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचा 8 ओव्हरनंतर स्कोअर” date=”03/10/2020,8:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या 7 षटकांनंतर धावा” date=”03/10/2020,8:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावर प्लेमध्ये दिल्लीच्या 57 धावा” date=”03/10/2020,8:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गब्बर धवन आऊट, दिल्लीला पहिला झटका” date=”03/10/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 5 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पृथ्वी शॉ-शिखर धवनची अर्धशतकी भागीदारी” date=”03/10/2020,7:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीची दमदार सुरुवात” date=”03/10/2020,7:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पृथ्वी शॉची फटकेबाजी, दिल्ली 3 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,7:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्ली 2 ओव्हरनंतर” date=”03/10/2020,7:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात” date=”03/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीचे 11 शिलेदार” date=”03/10/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताचे अंतिम 11 खेळाडू” date=”03/10/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू” date=”03/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताने टॉस जिंकला” date=”03/10/2020,7:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

आंद्रे रसेलने राजस्थान विरुद्ध मागील सामन्यात दुबईच्या मैदानात 3 सिक्स लगावले होते. तर दुसऱ्या बाजूला ऋषभ पंतला अजूनही त्याचा खेळ दाखवण्यास अपयश आले आहे. ऋषभ पंत या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. कारण लोकेश राहुल, इशान किशन आणि संजू सॅमसन सारखे विकेटकीपर बॅट्समन चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे ऋषभ पंतवर दबाव असणार आहे.

हेड टु हेड

आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत हे दोन्ही संघ एकूण 23 सामन्यात आमनेसामने भिडले आहेत. या 23 सामन्यांपैकी 13 सामन्यात कोलकाताचा विजय झाला आहे. तर दिल्ली संघाने 9 वेळा बंगळुरुचा पराभव केला आहे. तसेच 2019 मध्ये एक सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात दिल्लीचा विजय झाला होता. म्हणजेच दिल्लीने एकूण 10 सामने जिंकले आहेत.

कोलकाता संघात शुभमन गिल, आंद्रे रसेल आणि इयन मॉर्गन सारखे फलंदाज आहेत. तर दिल्लीकडे ऋषभ पंत, मार्क्स स्टोयनिस आणि श्रेयस अय्यर सारखे तगडे खेळाडू आहेत. दोन्ही संघात तगडे शॉट लावणारे खेळाडू आहेत. त्यामुळे आजच्या दुसऱ्या सामन्यात कोण वरचढ ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, खगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत, ईशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछाने, किमो पॉल, डेनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिच नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

कोलकाता नाइट राइडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरेन, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बेंटन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाईक आणि अली खान.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RCB vs RR, Live Score : राजस्थानचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

(delhi capitals vs kolkata knight riders live)

Published On - 11:29 pm, Sat, 3 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI