IPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, पहिल्या लढतीचं काऊंटडाऊन

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) यांच्यातील लढाईने आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात होत आहे.

IPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, पहिल्या लढतीचं काऊंटडाऊन
Follow us
| Updated on: Sep 19, 2020 | 1:58 PM

यूएई : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League ) अर्थात आयपीएलला आजपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचे 13 वे पर्व यूएईमध्ये खेळवला जात आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) यांच्यातील लढाईने आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात होत आहे. संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. (MIvsCSk Live)

रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंह धोनीची चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मात्र चेन्नईला सुरेश रैनाची कमतरता जरुर भासणार आहे.

आयपीएलच्या 12 व्या पर्वात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात एकूण 28 सामने खेळले होते. यामध्ये चेन्नईने 11 तर मुंबई इंडियन्सने तब्बल 17 सामन्यात बाजी मारली होती. यंदाच्या मोसमात कोण विजयी सुरुवात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यापूर्वीच्या आयपीएल हंगामात या दोन्ही संघातच 3 वेळा अंतिम लढत झाली होती. यात मुंबई इंडियन्सने दोन वेळा विजय मिळवून, आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती.

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समध्ये क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरन पोलार्ड, हार्दिक आणि कृणाल पांड्या असे उत्तम फलंदाज आहेत. मात्र 2014 मध्ये यूएईच्या मैदानावर खेळलेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला फार यश मिळाले नव्हते. त्यामुळे पहिल्याच सामन्यात त्यांच्यासमोर चेन्नईचं मोठे आव्हान आहे.

दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्समध्ये शेन वॉटसन, अंबाती रायुडू, केदार जाधव, रवींद्र जडेजा आणि ब्रावोसारखे उत्तम फलंदाज आहेत.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, किरन पोलार्ड, क्विंटन डी कॉक, मिचेल मॅक्लेघन, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिन्सन, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, इशान किशन, अनुकुल रॉय , आदित्य तारे, शेरफेन रदरफोर्ड, जयंत यादव, क्रिस लिन, सौरभ तिवारी, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय सिंह, नाथन कुल्टर नाइल, मोहसिन खान, धवल कुलकर्णी.

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो, फाफ डुप्लेसी, हरभजन सिंह, इमरान ताहीर, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, जगदीसन नारायण , कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगिडी, मिचेल सँटनर, मोनू सिंह, एम विजय, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करन, पीयूष चावला, जोश हेजलवूड.

(MIvsCSk Live)

संबंधित बातम्या :

IPL 2020 : सलामीच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज, रोहित शर्माने उलगडलं रहस्य

IPL 2020 | सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नईपेक्षा रोहितची मुंबई भारी, गौतम गंभीरला विश्वास

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.