IPL 2020, MI vs DC, Qualifier 1 : खराब कामगिरीमुळे पृथ्वी शॉ नेटीझन्सच्या निशाण्यावर, मीम्सद्वारे ट्रोल

| Updated on: Nov 06, 2020 | 1:09 AM

मुंबईविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शून्यावर बाद झाला.

IPL 2020, MI vs DC, Qualifier 1 : खराब कामगिरीमुळे पृथ्वी शॉ नेटीझन्सच्या निशाण्यावर, मीम्सद्वारे ट्रोल
Follow us on

दुबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 57 धावांनी मात करत आयपीएलच्या 13 व्या मोसमातील अंतिम सामन्यात सहाव्यांदा धडक मारली आहे. मुंबईने दिल्लीला विजयासाठी 201 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. मुंबईच्या गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी शरणागती पतकारली. दिल्लीच्या सलामीचे फलंदाजानी निराशाजनक कामगिरी केली. चांगल्या फॉर्मात असलेले ‘गब्बर’ शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) शून्यावर बाद झाले. तर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) नेहमीप्रमाणे निराशाजनक कामगिरी केली. पृथ्वी शून्यावर बाद झाला. पृथ्वीच्या सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरीमुळे त्याला नेटीझन्सने चांगलंच ट्रोल केलं आहे. तर मीम्ससद्वारे प्रश्न विचारत चांगलंच धारेवर धरलं आहे. ipl 2020 qualifier 1 mi vs dc prithvi shaw trolls on social media

पाहा भन्नाट मीम्स

 

 

पृथ्वीची मागील आठ डावांमधील कामगिरी

पृथ्वीची गेल्या 8 सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली आहे. पृथ्वीने मागील 8 सामन्यात अनुक्रमे 0,9,10,7,0,0,4,19 अशा धावा केल्या आहेत. यामुळे पृथ्वीच्या निराशाजनक कामगिरीनंतरही त्याला वारंवार संधी का दिली जाते, असा प्रश्नही क्रिकेट प्रेमींनी उपस्थित केला आहे.

सामन्यात एकूण 6 खेळाडू शून्यावर बाद

क्वालिफायर 1 च्या या सामन्यात एकूण 6 खेळाडू शून्यावर बाद झाले. यामध्ये मुंबई इंडियन्सचे एकूण 2 फलंदाज शून्यावर बाद झाले. तर दिल्ली कॅपिटल्सचे एकूण 4 बॅट्समन झिरोवर आऊट झाले.

दिल्लीला आणखी एक संधी

दिल्लीला पराभवानंतरही अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. 6 नोव्हेंबरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात एलिमिनेटर (Eliminator 2020) सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ 8 नोव्हेंबरला दिल्लीविरुद्ध क्वालिफायर 2 (Qualifier 2) सामन्यात भिडणार आहे. त्यामुळे दिल्लीला मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरही फायनलमध्ये पोहचण्यासाठी संधी मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs DC, Qualifier 1 : हिटमॅन रोहित शर्माची निराशाजनक कामगिरी, खराब विक्रमाची नोंद

IPL 2020, Qualifier 1, MI vs DC : जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक

ipl 2020 qualifier 1 mi vs dc prithvi shaw trolls on social media