IPL 2020, KKR vs RCB : बंगळुरुच्या एबी डीव्हीलियर्सची भन्नाट ‘शतकी’ कामगिरी

| Updated on: Oct 22, 2020 | 12:26 AM

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात एबीने ही कामगिरी केली आहे.

IPL 2020, KKR vs RCB : बंगळुरुच्या एबी डीव्हीलियर्सची भन्नाट शतकी कामगिरी
Follow us on

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह बंगळुरुने पॉइंट्सटेबलमध्ये मुंबई इंडियन्सला पछाडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. या सामन्यात मिस्टर 360 असलेला एबी डीव्हीलियर्सने अनोखी कामगिरी केली. फिल्डिंग करताना एबीने 2 कॅच पकडल्या. यात एबीने राहुल त्रिपाठी आणि टॉम बँटनचा कॅच पकडला. बॅंटनचा कॅच घेताच एबीने हा विक्रम केला आहे. IPL 2020 RCB Ab De Villiers Completed 100 Catches In IPL

काय आहे विक्रम?

एबीने आयपीएलमध्ये 100 कॅच घेण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. एबीने फिल्डर म्हणून 85 तर विकेटकीपर म्हणून 15 कॅच घेतल्या आहेत. डीव्हीलियर्सआधी आयपीएलमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक कॅच घेण्याची कामगिरी 3 जणांनीच केली आहे. महेंद्रसिंह धोनीने 108 कॅच घेतल्या आहेत. तर दिनेश कार्तिकच्या नावावर 106 झेल घेण्याची नोंद आहे. धोनी आणि कार्तिकने ही कामगिरी विकेटकीपर म्हणून केली आहे. तर सुरेश रैनाने एक फिल्डर म्हणून 102 झेल घेतल्या आहेत. रैना आयपीएलमध्ये फिल्डर म्हणून 100 कॅच घेणारा एकमेव फिल्डर आहे.

फिल्डर म्हणून सर्वाधिक कॅच घेण्याच्या यादीत सुरेश रैना (102 कॅच) पहिल्या क्रमांकावर आहे. किरन पोलार्ड दुसऱ्या (89 कॅच), रोहित शर्मा (88 कॅच) तिसऱ्या आणि एबी डीव्हीलियर्स (85 कॅच) चौथ्या क्रमांकावर आहे. तर विकेटकीपर म्हणून सर्वाधिक झेलचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनीने आतापर्यंत 108 झेल घेतल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक 106 झेलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एबीची आयपीएल कारकिर्द

एबीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 164 सामने खेळले आहेत. यात त्याने 153 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 680 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 133 ही एबीची सर्वोच्च धावासंख्या आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KKR vs RCB : मोहम्मद सिराजची धडाकेबाज कामगिरी, ठरला पहिलाच गोलंदाज

IPL 2020 RCB Ab De Villiers Completed 100 Catches In IPL