पंजाबच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या दीपक चहरच्या खांद्यावर धोनीला द्यायचीय ‘ही’ नवी जबाबदारी

| Updated on: Apr 17, 2021 | 9:12 AM

पंजाबच्या टॉप ऑर्डर बॅट्समनचं  चेन्नईच्या दीपक चहर (Deepak Chahar) या युवा गोलंदाजाने कंबरडं मोडलं. त्याच्या याच कामगिरीवर कर्णधार धोनी भलता खूश झाला आहे. धोनीने त्याला नवी जबाबदारी द्यायचं ठरवलं आहे. (IPL 2021 CSK vs PBKS MS Dhoni New responsibility To Deepak Chahar)

पंजाबच्या डावाला खिंडार पाडणाऱ्या दीपक चहरच्या खांद्यावर धोनीला द्यायचीय ही नवी जबाबदारी
दीपक चाहर आणि एम एस धोनी
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super King) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 6 विकेट्सने विजय मिळवला. पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबच्या टॉप ऑर्डर बॅट्समनचं चेन्नईच्या दीपक चहर (Deepak Chahar) या युवा गोलंदाजाने कंबरडं मोडलं. त्याच्या याच कामगिरीवर कर्णधार धोनी (MS Dhoni) भलता खूश झाला आहे. धोनीने त्याला नवी जबाबदारी द्यायचं ठरवलं आहे. (IPL 2021 CSK vs PBKS MS Dhoni New responsibility To Deepak Chahar)

चहरच्या खांद्यावर धोनी देणार नवी जबाबदारी

पंजाबविरुद्धच्या सामन्यात दीपक चेहरने कमालीची गोलंदाजी केली. त्याने निर्धारित 4 ओव्हर्समध्ये 1 ओव्हर निर्धाव टाकत केवळ 13 रन्स देऊन चार फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्याने फेकलेल्या 24 चेंडूंमधले 18 चेंडू निर्धाव होते. त्याच्या या मॅचविनिंग परफॉर्मन्सवर धोनी भलता खूश झाला.

“डेथ ओव्हर्समध्ये बोलिंग करण्याचा चहरजवळ अनुभव आहे पण आता त्याला पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये बोलिंग करण्याची नवी जबाबदारी सांभाळावी लागेल. कारण चेन्नईच्या संघात डेढ ओव्हर्समध्ये बोलिंग करण्यासाठी अनुभवी ड्वेन ब्राव्हो आहे. मला वाटतं की, चहरने आता इथून पुढे पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये बोलिंग करावी”, असं धोनी म्हणाला.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात चहरचा घातक स्पेल

शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना पार पडला. आज पुन्हा एकदा पंजाबचे बॅट्समन षटकारांचा पाऊस पाडतील, असा क्रिकेटप्रेमींचा अंदाज होता. परंतु पंजाबच्या डावाची खराब सुरुवात झाली. दीपक चहरने पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवालला शानदार इनस्विंग टाकून क्लिन बोल्ड केलं तर सिक्सर किंग गेल, दीपक हुडा आणि निकोलस पूरनलाही त्याने आपल्या जाळ्यात ओढलं. म्हणजेच जवळपास दीपकने पंजाबच्या सगळ्या बिट हिटर्सला तंबूत धाडलं.

दीपकची आयपीएलमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी

दीपकने निर्धारित 4 ओव्हर्समध्ये 1 ओव्हर निर्धाव टाकत केवळ 13 रन्स देऊन पंजाबच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्याने फेकलेल्या 24 चेंडूंमधले 18 चेंडू निर्धाव होते. आयपीएलच्या इतिहासातली दीपक चाहरची ही आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ बोलिंग आहे. याअगोदर त्याने 2018 मध्ये सनरायजर्स हैदराबादविरुद्ध निर्धारित 4 ओव्हर्समध्ये 15 रन्स देऊन 3 बळी मिळवले होते.

(IPL 2021 CSK vs PBKS MS Dhoni New responsibility To Deepak Chahar)

हे ही वाचा :

आयपीएल सामन्यांचा थरार सुरु, मात्र मोहम्मद शमीला खंत, सांगितली मनातली गोष्ट!

बेन स्टोक्स 12 आठवड्यांसाठी क्रिकेटपासून लांब, संघासोबत न राहता मायदेशी परतणार, या दिवशी सर्जरी होणार

IPL 2021 : दीपक चाहर ठरला पंजाबचा कर्दनकाळ, धोनीला खास सामन्याचं खास गिफ्ट!