AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021, MS Dhoni | पंजाब विरुद्धच्या सामन्यात ‘कॅप्टन कूल’ रचणार इतिहास, महेंद्रसिंह धोनी लगावणार अनोखं ‘द्विशतक’

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 8 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. महेंद्रसिंह धोनीचा (mahendra singh dhoni play his 200th match) चेन्नईकडून खेळतानाचा हा 200 वा सामना आहे.

IPL 2021, MS Dhoni | पंजाब विरुद्धच्या सामन्यात 'कॅप्टन कूल' रचणार इतिहास, महेंद्रसिंह धोनी लगावणार अनोखं 'द्विशतक'
आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 8 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. महेंद्रसिंह धोनीचा (mahendra singh dhoni play his 200th match) चेन्नईकडून खेळतानाचा हा 200 वा सामना आहे.
| Updated on: Apr 16, 2021 | 5:54 PM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील (IPL 2021) 8 वा सामना आज (16 मार्च) खेळण्यात येणार आहे. या सामन्यात 2 किंग्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना पंजाब किंग्स punjab kings विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी मैदानात उतरताच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (mahendra singh dhoni) इतिहास रचणार आहे. धोनी पंजाब विरुद्ध द्विशतक झळकावणार आहे. धोनीला हे द्विशतक लगावण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. (ipl 2021 pbks vs csk chennai super kings captain mahendra singh dhoni play his 200th match for Chennai against punjab kings)

धोनीचे अनोखे द्विशतक

धोनी पंजाब विरुद्ध धावांच द्विशतक नाही तर सामन्याचं द्विशतक लगावणार आहे. पंजाब विरुद्धचा हा सामना चेन्नईसाठीचा धोनीचा 200 वा सामना असणार आहे. त्यामुळे धोनीचं या सामन्यासाठी मैदानात उतरताच हे अनोखं द्विशतक पूर्ण होणार आहे.

धोनीचा 200 व्या सामन्यापर्यंतचा प्रवास

धोनीने आतापर्यंत 199 सामन्यात चेन्नईचे नेतृतव केलं आहे. या 199 सामन्यांमध्ये 24 सामने हे चॅम्पियन्स लीगमधील आहेत. धोनीने या एकूण 199 मॅचेसमध्ये 138.80 च्या स्ट्राईक रेटने 22 अर्धशतकांसह 4 हजार 507 धावा केल्या आहेत. यात त्याने 308 चौकार आणि 212 सिक्स लगावले आहेत. धोनीची 84 ही आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

यशस्वी कर्णधार

धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 3 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. धोनी आयपीएलमध्ये रोहित शर्मानंतरचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. तसेच धोनी आयपीएलमध्ये यशस्वी फलंदाज राहिला आहे. धोनी आणि चेन्नईसाठी आयपीएलचा 13 वा मोसम हा निराशाजनक राहिला. चेन्नईने गतमोसमात साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आले होते. तसेच या 14 व्या पर्वाचीही सुरुवात पराभवाने झाली.

दुसरा सामना पंजाब विरुद्ध

या मोसमातील दुसरा सामना पंजाब विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून 14 व्या पर्वातील पहिला विजय साकारण्याचा प्रयत्न चेन्नईचा असणार आहे. त्यामुळे धोनीकडून चेन्नईसाठीच्या 200 व्या सामन्यात विशेष आणि अफलातून कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

अशी आहे चेन्नई सुपर किंग्सची टीम

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर) , इमरान ताहीर, लुंगी एन्गिडी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, दीपक चाहर, नारायण जगदीशन, सुरेश रैना, मिचेल सँटनर, केएम आसिफ, शार्दुल ठाकुर, आर. साई किशोर, फॅफ डु प्‍लेसीस, ड्वेन ब्राव्हो, जोश हेझलवुड, सॅम करन, कर्ण शर्मा, रॉबिन उथप्‍पा, के गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा आणि सी हरि निशांत.

संबंधित बातम्या :

PK vs CSK IPL 2021 Match Prediction | के एल राहुल विरुद्ध महेंद्रसिंह धोनी आमनेसामने, पंजाब बाजी मारणार की चेन्नई पहिला विजय साकारणार?

IPL 2021 CSK vs PKBS : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?

(ipl 2021 pbks vs csk chennai super kings captain mahendra singh dhoni play his 200th match for Chennai against punjab kings)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.