IPL 2021 MI vs KKR head to head records : रोहितची मुंबई पटलन कोलकात्याला हरवणार?, वाचा इतिहासाची पाने…

| Updated on: Apr 13, 2021 | 2:41 PM

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Head To Head Records : आयपीएल इतिहासात केकेआर आणि मुंबईचा संघ 27 वेळा आमनेसामने आली आहे. त्यातले 21 सामने मुंबईने जिंकले आहेत तर केवळ 6 सामने कोलकात्याने जिंकले आहेत.

IPL 2021 MI vs KKR head to head records : रोहितची मुंबई पटलन कोलकात्याला हरवणार?, वाचा इतिहासाची पाने...
कोलकात्याला आज मुंबईचं चॅलेंज
Follow us on

चेन्नई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) पाचवा सामना मंगळवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium Chennai) खेळला जाणार आहे. कोलकात्याने सलामीच्या सामन्यात हैदराबादला नमवून आयपीएलच्या 14 व्या पर्वाची थाटात सुरुवात केली आहे. हीच कायम ठेवण्याचा कोलकात्याचा मानस असेल. तर बंगळुरुकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या मुंबईपुढे स्पर्धेत कमबॅक करण्याचं आव्हान असेल. (IPL 2021 Mi KKR Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Head To Head Records)

पाठीमागच्या दोन हंगामात प्ले ऑफमध्ये जागा न मिळवलेल्या कोलकात्याने आयपीएलच्या 14 व्या पर्वाच्या सलामीच्या सामन्यात हैदराबादला 10 रन्सने नमवलं. नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीने खेळलेल्या दमदार इनिंगनंतर मधल्या फळीतील बॅट्समन दिनेश कार्तिकने शेवटच्या ओव्हरमध्ये शानदार फटकेबाजी करत कोलकात्याला मजबूत धावसंख्या गाठून दिली. त्याने 9 बॉलमध्ये 21 रन्स फटकावले.

नितीश राणा, राहुल त्रिपाठी तुफान फॉर्मात

कोलकाता विरुद्ध विरुद्ध हैदराबाद सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून कोलकात्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. या सामन्यात कोलकात्याचा सलामीवीर नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावांची खेळी करत कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. या खेळीत त्याने उत्तुंग 4 षटकार खेचले. कोरोनावर मात करताच त्याने धमाकेदार इनिंग साकारली. या सामन्यात नितीश राणाने 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याचं हे आयपीएलमधील 12 वं अर्धशतक ठरलं. तो सध्या तुफान फॉर्मात आहे. राहुल त्रिपाठी आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. त्यानेही हैदराबाद विरुद्ध 29 चेंडूत 53 धावांची खेळी केली. आंद्रे रसेल आणि कर्णधार ओयन मॉर्गन यांच्याकडूनही संघाला चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

इतिहास काय सांगतो, कुणाचा पगडा भारी?

आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात केकेआर आणि मुंबई टीम 27 वेळा आमनेसामने आली आहे. त्यातले 21 सामने मुंबईने जिंकले आहेत तर केवळ 6 सामने कोलकात्याने जिंकले आहेत. पाठीमागील 5 सामन्यांपैकी मुंबईने 4 सामने जिंकलेत. म्हणजेच मुंबई कोलकात्यावर वरचढ आहे.

रोहितची बॅट आज बोलणार?

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा 19 धावा करुन रन आऊट झाला होता. पहिल्या सामन्यात त्याला मोठी खेळी करण्यात यश आलं नव्हतं. आज त्याची बॅट बोलणार का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ख्रिस लिनऐवजी आज मुंबईच्या संघात क्विंटन डि कॉक पुनरागमन करु शकतो, असं बोललं जातंय. जर क्विंटनने पुनरागमन केलं तर मुंबईच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक करतील. नंतर इशान किशान, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड असे एकापेक्षा एक फलंदाज चेन्नईच्या मैदानावर आपला जलवा दाखवतील.

(IPL 2021 Mi KKR Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Head To Head Records)

हे ही वाचा :

IPL 2021 MI vs KKR live streaming: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 : दीपक हुडाच्या वादळी खेळीनंतर कृणाल पांड्या का होतोय ट्रोल?, कारणही तसंच महत्त्वाचं…

IPL 2021 : ‘संजू…. तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’, मॉरिसच्या प्रश्नावर सॅमसनचं खास उत्तर