AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 MI vs KKR live streaming: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, सामना कधी, कुठे, केव्हा?

MI vs KKR live streaming : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) पाचवा सामना मंगळवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला जाणार आहे.

IPL 2021 MI vs KKR live streaming: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,  सामना कधी, कुठे, केव्हा?
IPL 2021 MI vs KKR
| Updated on: Apr 13, 2021 | 1:21 PM
Share

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) पाचवा सामना मंगळवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबईला आयपीएलच्या सलामीच्याच लढतीत विराटच्या बंगळुरुकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. तर कोलकात्याने मात्र हैदराबादला नमवून आयपीएलच्या 14 व्या पर्वाची थाटात सुरुवात केली आहे. आज मुंबई मागील सामन्यातला पराभव विसरुन जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल तर थाटात सुरुवात केलेला कोलकाता संघ दुसऱ्या विजयासाठी आसुसलेला असेल. एकंदरितच दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील ते जिंकण्याच्या इराद्यानेच…! (IPL 2021 MI vs KKR live streaming When And Where to Watch Online Free in Marathi)

क्विंटन डिकॉक संघात परतणार?

मुंबईची टीम संथ गतीच्या सुरुवातीसाठी ओखळली जाते मात्र एकदा लयीत आली की मुंबईला रोखणं इतर संघासाठी अवघड होऊन बसतं. आज मुंबईच्या संघात क्विंटन डी कॉक पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मुंबईची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न संघातील खेळाडू करतील. तर हैदराबादला नमवून आत्मविश्वास दुणावलेल्या कोलकात्याला दुसऱ्या विजयाची प्रतिक्षा लागलेली असेल.

दोन्ही संघात तितकेच तुल्यबळ आणि सामना फिरवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. मुंबईकडे तर अगदी आठ नंबरचा खेळाडू देखील उत्तम बॅटिंग करु शकतो, इतकी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. तर दुसरीकडे जगातील कोणत्याही बोलिंग युनिटचा यथेच्छ समाचार घेण्याची क्षमता असलेला स्टार बॅट्समनचा भरणा कोलकाचा संघात आहे.

मुंबई इंडियन्स

ख्रिस लिनऐवजी आज मुंबईच्या संघात क्विंटन डि कॉक पुनरागमन करु शकतो, असं बोललं जातंय. जर क्विंटनने पुनरागमन केलं तर मुंबईच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक करतील. नंतर इशान किशान, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड असे एकापेक्षा एक फलंदाज चेन्नईच्या मैदानावर आपला जलवा दाखवतील. तर जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, कुल्टर नाईल वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

कोलकाता नाईट रायडर्स

दुसरीकडे कोलकात्याचा संघात नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, शुभमन गिल, ओयन मॉर्गन असे स्फोटक बॅट्समन आहेत. तर शाकिब अल हसन आणि आंद्रे रसेल यांच्यासारखे जगातले सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, पॅट कमिन्स,  हरभजन सिंग या गोलंदाजांवर मुंबईला रोखण्याची मदार असेल.

सामना कधी आणि कुठे…?

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील पाचवा सामना आज 13 एप्रिल रोजी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी+हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या बवेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 MI vs KKR live streaming When And Where to Watch Online Free in Marathi)

हे ही वाचा :

IPL 2021 : दीपक हुडाच्या वादळी खेळीनंतर कृणाल पांड्या का होतोय ट्रोल?, कारणही तसंच महत्त्वाचं…

IPL 2021 : ‘संजू…. तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’, मॉरिसच्या प्रश्नावर सॅमसनचं खास उत्तर

IPL 2021 : वानखेडेवरील दीपक हुडाच्या त्सुनामीपुढे मरीन ड्राईव्हच्या लाटाही काही काळ शांत, खणखणीत 6 षटकार! राजस्थानच्या बोलर्सला तुडवलं!

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.