IPL 2021 : वानखेडेवरील दीपक हुडाच्या त्सुनामीपुढे मरीन ड्राईव्हच्या लाटाही काही काळ शांत, खणखणीत 6 षटकार! राजस्थानच्या बोलर्सला तुडवलं!

मुंबईच्या वानखेडे मैदानावर दीपक हुडा नावाची त्सुनामी आली ज्याच्यापुढे मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या समुद्राच्या लाटाही काही काळ शांत राहिल्या. | (Dipak Hooda Six Sixes in Wankhede Mumbai)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:45 AM, 13 Apr 2021
IPL 2021 : वानखेडेवरील दीपक हुडाच्या त्सुनामीपुढे मरीन ड्राईव्हच्या लाटाही काही काळ शांत, खणखणीत 6 षटकार! राजस्थानच्या बोलर्सला तुडवलं!
दीपक हुडाची आक्रमक खेळी

मुंबई : पंजाब किंग्जचा (Punjab Kings) आक्रमक बॅट्समन दीपक हुडाने (Dipak Hooda) राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) वादळी खेळी केली. मुंबईच्या वानखेडे मैदानावर दीपक हुडा नावाची त्सुनामी आली ज्याच्यापुढे मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या समुद्राच्या (Marine Drive Mumbai) लाटाही काही काळ शांत राहिल्या. त्याने राजस्थानच्या बोलर्सला अक्षरश: बुकलून काढलं. त्याने केवळ 28 बॉलमध्ये 64 धावा काढल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्यातले दोन षटकार तर एवढे क्लाकिस मारले की टीव्हीवर मॅच पाहणाऱ्या प्रेक्षकांना बॉल चर्चगेटला गेला की काय, असा भास झाला. (IPL 2021 PBKS vs RR Dipak Hooda Six Sixes in Wankhede Mumbai)

टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय राजस्थानच्या अंगलट

राजस्थानने टॉस जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. पण राजस्थानचा निर्णय त्यांच्या अंगलट आला. पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवालने डावाची सुरुवात केली. दोन चौकार मारुन मयांक आऊट झाला. मात्र ड्रेसिंग रुममधूनच सेट होऊन आल्यासारखा के.एल. राहुल राजस्थानच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता.

मयांक आऊट झाल्यानंतर मैदानात द युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचं आगमन झालं. त्यानेही 28 चेंडूमध्ये 40 धावा केल्या. या दोन षटकारांबरोबर गेलने आयपीएलमधील 350 षटकार पूर्ण केले. असा कारनामा करणारा आयपीएलच्या इतिहासातील तो एकमेव बॅट्समन ठरला.

पुरनला पाठीमागे ठेऊन दीपकला संधी, दीपकने संधीचं सोनं नाही तर हिरे-मोती केले

ख्रिस गेल आऊट झाल्यानंतर पंजाबचा आक्रमक बॅट्समन ज्याने एकाच ओव्हरमध्ये मागील मोसमात 5 षटकार लगावले होते त्या निकोलस पुरनला पाठीमागे ठेऊन पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने आणि कर्णधार के.एल. राहुलने दीपक हुडाला फलंदाजीसाठी वरच्या क्रमाकांवर खेळण्याची संधी दिली. त्या संधीचं दीपकने सोनं नाही तर हिरे-मोती केले.

दीपकने केवळ 20 चेंडूत दणदणीत अर्धशतक ठोकलं. पळून धावा काढण्याऐवजी त्याने चौकार षटकार मारणं पसंत केलं. त्याच्या खेळीत त्याने उत्तुंग 6 षटकार खेचले. तसंच चार उत्तम आणि क्लासिक चौकार मारले. त्याच्या खेळीने पंजाबला धावांचा डोंगर उभारता आला.

केएल राहुल आणि दीपक हुडा या दोघा बॅट्समनमध्ये तिसऱ्या विकेटसाठी घणाघाती 105 रन्सची पार्टनरशीप झाली. केएल राहुलनेही आक्रमक खेळी करत 50 चेंडूत 91 धावा फटकावल्या. दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 221 धावा काढल्या.

(IPL 2021 PBKS vs RR Dipak Hooda Six Sixes in Wankhede Mumbai)

हे ही वाचा :

IPL 2021 : 19 बॉलमध्ये 90 धावा ठोकल्या, तरीही मॅच गेली, सामन्यानंतर सॅमसन म्हणाला, ‘यापेक्षा मी अधिक काय करु शकत होतो…?’

IPL 2021 : शेवटच्या ओव्हर्सचा थरार, 6 बॉल 13 धावांची गरज, संजू-ख्रिस मैदानावर, पण या 22 वर्षीय बोलरने चाहत्यांची मनं जिंकली!

IPL 2021 : 41 वर्षीय गेलचा आयपीएलमध्ये मोठा रेकॉर्ड, आजपर्यंत कोणत्याही बॅट्समनला असा कारनामा जमला नाही!