AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पॅट कमिन्सचा अवघड कॅच घेतल्यानंतर अति आनंद, रियान परागचं चर्चेतलं हे सेलिब्रेशन नक्की बघा…!

शेवटच्या काही ओव्हरमध्ये फटकेबाजी करणाच्या मुडमध्ये असणाऱ्या पॅट कमिन्सचा अवघड वाटणारा कॅच रियान परागने बाऊन्ड्री लाईनवर घेतला. (IPL 2021 RR vs KKR Riyan parag Celebration After pat cummins Catch)

Video : पॅट कमिन्सचा अवघड कॅच घेतल्यानंतर अति आनंद, रियान परागचं चर्चेतलं हे सेलिब्रेशन नक्की बघा...!
रियान पराग
| Updated on: Apr 25, 2021 | 7:05 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) युवा खेळाडू रियान पराग (Riyan Parag) एखादा परफॉर्मन्स दिल्यावर सेलिब्रेशन करण्यासाठी खास ओळखला जातो तसंच आतापर्यंतच्या मॅचमध्ये त्याच्या सेलिब्रेशनची खूप चर्चा झालीय. परागच्या बिहू डान्सचे तर लोक दिवाने आहेत. कॅच असो वा रन आऊट पराग डान्स करणार म्हणजे करणार…! अशातच शनिवारी कोलकाता विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात परागने पॅट कमिन्सचा (Pat Cummins) अफलातून कॅच घेतला. कॅचनंतर परागने राहुल तेवतियासोबत (Rahul Tewatiya) केलेलं सेलिब्रेशनही अप्रतिम होतं. त्याच सेलिब्रेशनची सध्या क्रिकेट विश्वास चर्चा सुरु आहे. (IPL 2021 RR vs KKR Riyan parag Celebration After pat cummins Catch)

रियान परागचं खास सेलिब्रेशन

शेवटच्या काही ओव्हरमध्ये फटकेबाजी करणाच्या मुडमध्ये असणाऱ्या पॅट कमिन्सचा अवघड वाटणारा कॅच रियान परागने बाऊन्ड्री लाईनवर घेतला. यावेळी रियान परागच्या शेजारी राहुल तेवतिया फिल्डिंग करत होता. या दोघांनीही कॅचनंतर सेल्फीची अॅक्टिंग केली. परंतु त्यांच्या हातात ना मोबाईल होता ना सेल्फी स्टिक…! तरीही दोघेही अतिशय थाटात उभे राहिले आणि जसं आपण सेल्फीला पोझ देतो तशी पोझ त्यांनी दोन सेकंद देऊन खास पद्धतीने सेलिब्रेशन केलं.

रियान पराग आणि राहुल तेवतियाचं हे सेलिब्रेशन खास ठरलं. आयपीएलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. क्रिकेट रसिकांना फार दिवसांनंतर असं अनोखं सेलिब्रेशन बघायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

या सेल्फीचा हिस्सा आणखी कुणाकुणाला व्हायचंय…?

राहुल-परागचा खास फोटो राजजस्थान रॉयल्सने देखील आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटरवर फोटो शेअर करत या सेल्फीचा हिस्सा आणखी कुणाकुणाला व्हायचंय?, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

रियान परागचे 2 कॅच

रियान परागने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात बोलिंग केली नाही परंतु शानदार 2 कॅच घेतले. त्याने पॅट कमिन्ससोबतच राहुल त्रिपाठीचा देखील कॅच घेतला.

राजस्थानचा कोलकात्यावर 6 विकेट्सने विजय

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 6 विकेट्सने विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या

(IPL 2021 RR vs KKR Riyan parag Celebration After pat cummins Catch)

हे वाचा :

IPL Purple Cap : दिग्गजांना पछाडत भारतीय युवा बोलर्स अग्रस्थानी, बॅट्समनचा ठरतोय कर्दनकाळ!

RR vs KKR, IPL 2021 Match 18 Result | कर्णधार संजू सॅमसनची नाबाद संयमी खेळी, राजस्थानचा कोलकातावर 6 विकेट्सने विजय

IPL 2021 | पंजाब विरुद्ध मुंबईचा दारुण पराभव, हिटमॅन रोहितच्या निर्णयावर सेहवाग संतापला, म्हणाला…

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.