AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Big Breaking : आयपीएलमध्ये कथित मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी, CBIकडून तीन जणांना अटक

आपीएलमध्ये एक रॅकेट भारतीय टी 20मध्ये कथितपणे मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये सहभागी आहे.

IPL Big Breaking : आयपीएलमध्ये कथित मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी, CBIकडून तीन जणांना अटक
Image Credit source: social
| Updated on: May 14, 2022 | 5:23 PM
Share

मुंबई : आपीएलमध्ये (IPL 2022) कथित मॅच फिक्सिंग (match fixing) आणि सट्टेबाजीचं (Betting) प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात सीबीआयनं (CBI) तीन जणांना अटक केली आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सीबीआय अधिकऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात आलंय की, एक रॅकेट भारतीय टी 20मध्ये कथितपणे मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये सहभागी आहे. अधिक माहितीनुसार या रॅकेटसंदर्भात पाकिस्तानमधून मिळालेल्या माहितीवरुन सीबीआयने कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने तीन जणांना अटक केली आहे. पुढील तपास चालू आहे.

आयपीएलमध्ये सध्या काय चाललयं?

आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर होता. तर पंजाब किंग्सचा संघ 5 विजयासह 8 व्या स्थानावर होता. पण कालच्या आरसीबीवरील विजयामुळे पंजाबच्या क्रमावरीत दोन स्थानांची सुधारणा झाली आहे. पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन टीम्सना फटका बसला आहे. पंजाब किंग्सचे अजून दोन सामने बाकी असून त्यांचे 16 पॉइंटस होऊ शकतात. पराभवानंतरही आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर आहे. RCB चा आता फक्त एक सामना उरला आहे.

अंबाती रायुडू 10 मिनिटात निवृत्तीच्या घोषणेवरुन पलटला

चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज अंबाती रायुडूने आयपीएलच्या (IPL) या सीजननंतर निवृत्तीची घोषणा केली होती. पण 10 मिनिटात तो आपल्या निर्णयावरुन पलटला. अंबाती रायुडूने टि्वट करुन हे शेवटचं आयपीएल असल्याचं म्हटलं होतं. 13 वर्षांचा हा प्रवास खूप सुंदर होता, असं त्याने लिहिलं होतं. रायुडूच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर वेगाने तो निवृत्त होणार असल्याची बातमी पसरली. त्यानंतर 10 मिनिटात त्याने निवृत्तीचं टि्वट डिलीट केलं. रायुडूने टि्वट डिलीट केल्यानंतर CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी अंबाती रायुडू सन्यास घेत नसल्याची माहिती दिली. “मी आनंदाने घोषणा करतो की, ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा आहे. मागची 13 वर्ष मी दोन चांगल्या संघांसोबत होतो. या शानदार प्रवासासाठी मी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा आभारी आहे” असं त्याने टि्वटमध्ये म्हटलं होतं.

टि्वट डिलीट का केलं?

अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा करणं आणि त्यानंतर दहा मिनिटात टि्वट डिलीट करणं यावरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पहिला प्रश्न म्हणजे चेन्नई आणि अंबाती रायुडूमध्ये सर्व ठीक आहे ना?. रवींद्र जाडेजाने चेन्नईची साथ सोडली आहे. जाडेजा चेन्नई सुपर किंग्सच्या मॅनेजमेंटवर नाराज होता. आता रायुडूने निवृत्तीची घोषणा केली नंतर माघार घेतली. त्यानंतर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. हे सर्व संशयास्पद आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.