Riyan Parag : सामना सुरू असतानाच ओढली ई-सिगारेट, त्या कृतीमुळे रियान पराग अडचणीत, RR च्या कॅप्टनवर होणार कारवाई ? नेमकं काय घडलं ?
Rajasthan Royals, Riyan Parag : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग हा आता अडचणीत सापडू शकतो. कारण पंजाब आणि राजस्थानची मॅच सुरू असतानास त्याने जे केलं, त्यामुळे तो चर्चेत आला आहे. त्याचा एक पोटो सध्या सगळीकडे व्हायरल झाला असून त्याच्यावर कारवाई ?

Riyan Parag Captured Vaping : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2026) राजस्थान रॉयल्सचा (आरआर) संघ सातत्याने वादात सापडताना दिसत आहे. आधी संघाच्या कोचिंग स्टाफने सामन्यांदरम्यान मोबाईल फोनचा वापर केला होता आणि आता तर संघाचा कर्णधार रियान पराग यानेच सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यामुळे तो मोठ्या अडचणीत सापडू शकतो आणि त्याच्यावर कारवाईची टांगती तलवारही आहे. कारण पंजाब किंग्सविरोधात 28 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यादरम्यान, रियान परागचा एक फोटो समोर आला असून त्यामुळेच मोठी खळबळ माजली आहे.
पंजाब किंग्स (PBKS) विरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थानचा कर्णधार असलेला रियान हा, संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये व्हेप (ई-सिगरेट) वापरताना कॅमेऱ्यात कैद झाला. दुसऱ्या डावाच्या 16 व्या ओव्हरदरम्यान रेकॉर्ड झालेला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो व्हेपिंग करत असताना एकटाच नव्हता, तर तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये बाकीचे खेळाडूही उपस्थित होते. रियन परागच्या या कृतीमुळे केवळ त्याच्याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही, तर राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनावरही बोट ठेवलं जात आहे.
काय होऊ शकते शिक्षा ?
मंगळवारी (28 एप्रिल) मुल्लानपूर येथील PCA स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पंजाब वि. राजस्थान सामन्यादरम्यान घडलेल्या घटनेप्रकरणी, बीसीसीआय कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. रियान परागने केलेलं कृत्य हे खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन असून, ते खेळाची बदनामी करण्यासारखे आहे. याबद्दल मॅच रेफरी त्याला अधिकृत ताकीद देऊ शकतात, किंवा खेळाडूच्या सामना शुल्कातून काही भाग कापला जाऊ शकतो, अन्यथा निलंबनाची शिक्षाही देण्यात येऊ शकते.
राजस्थनान रॉयल्सचा संघ आधीही सापडला होता वादात
आयपीएल 2026 मधील राजस्थान रॉयल्सच्या सर्वात मोठ्या विजयानंतर ही घटना घडली आहे. लीगमधील अपराजित संघ पंजाब किंग्सविरुद्ध, राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकात 223 धावांचे लक्ष्य पूर्ण करून 6 गडी राखून विजय मिळवला. परागने 16 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचले, मात्र याच विजयसोबत त्यांनी आपल्या नावावर आणखी एका मैदानाबाहेरील वादाची भर घातली.
ह्या सीझनच्या सुरुवातीला, संघ व्यवस्थापक रोमी भिंदर एका लाइव्ह सामन्यादरम्यान युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसोबत डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरताना दिसले होते. हा आयपीएलच्या नियमांचा भंग होता आणि भिंदर यांना दंड ठोठावण्यात आला तसेच ताकीदही देण्यात आली. मात्र तरीही त्यांनी वैद्यकीय कारणांचा हवाला देऊन यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. तर आता कर्णधार रियानहाच ई-सिगारेट ओढताना दिसल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर रियान पराग टार्गेटवर
पंजाब किंग्जविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा संघ धावांचा पाठलाग करत असतानाच आता कर्णधार रियान पराग व्हेपिंग करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्याच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Riyan Parag caught smoking vape on live Tv .. this is bad https://t.co/WilZrcJUU6
— ExtraOrdinary (@Extreo_) April 28, 2026
Riyan parag was caught vaping in dressing room ,how it’s allowed inside dressing room bcci whats happening pic.twitter.com/BsYHuunBuj
— cherry_gems (@Introvert2core) April 28, 2026
🚨 RIYAN PARAG VAPING DURING MATCH 🚨
Not a good look for a professional. pic.twitter.com/QaDIO8lThE— MARCUS (@MARCUS907935) April 28, 2026
मॅनेजमेंटवरही सवाल
मात्र, दोष केवळ रियान परागचाच नाही, तर राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनावरही बोट दाखवले जात आहे. आरआर व्यवस्थापनाने रियान परागला व्हेपिंग करण्याची परवानगी कशी दिली? तेही अशा ड्रेसिंग रूममध्ये, जिथे वैभव सूर्यवंशीसारखे अवघ्या 15 वर्षांचे खेळाडू आणि या मोसमातच आयपीएलच्या झगमगत्या दुनियेत पदार्पण केलेले इतर प्रतिभावान तरुण खेळाडूही आहेत. असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. आता या वादानंतर याप्रकरणात BCCI काय कारवाई करतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.