
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांने आपली पत्नी सफा बेग हिच्यासोबतचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जवळपास ती बुर्ख्यातच दिसून येते. इरफान आणि सफा 2016 साली लग्नाच्या बेडीत अडकले.

इरफानचे जवळचे मित्र, नातेवाईक आणि काही आमंत्रित मोजकी लोकं इतक्याच लोकांनी लग्नाला उपस्थिती लावली होती. कारण हे लग्न हायप्रोफाईल होतं. या लग्नसोहळ्याचं अनेकांनी सिक्रेट पाळलं गेलं होतं.

इरफानची ओळख सगळ्या जगाला आहे. पण त्याच्या पत्नीविषयी फार कमी लोकांना माहितीय. सफाचे वडील मिर्झा फारूक बेग हे सौदी अरेबियाचे बिझनेसमॅन आहेत. सफा आणि इरफान यांची दुबईमध्ये पहिली भेट झाली. सफाचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. ती सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये वाढली आणि इंटनॅशनल इंडियन स्कूलमध्ये तिचं शिक्षण झालं.

27 वर्षांची सफा खूप सुंदर आहे. ती मध्य पूर्व आशियातील एक प्रसिद्ध मॉडेल आहे आणि तिने अनेक नामांकित मासिकांमध्ये तिची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. लग्नानंतर सफाने तिचे आयुष्य खाजगी ठेवणे पसंत केले.

सौदी अरेबियातील मॉडेलिंग इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर सफा लग्नानंतरच्या बर्याच फोटोंमध्ये बुरख्यात दिसली आहे. 2016 मध्ये लग्न झालेल्या इरफान आणि सफाला एक मुलगा आहे. त्याचं नाव इमरान आहे.

इरफान पठानने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इरफान हा टीम इंडियाचा महत्त्वपूर्ण सदस्य राहिला आहे. 2007 मध्ये टी -२० विश्वचषक जिंकणार्या संघातील तो एक खेळाडू होता. 2007 च्या विश्वचषचातील अंतिम सामन्यात इरफानने 4 षटकांत 16 धावा देऊन 3 बळी मिळवले होते आणि त्याच्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं होतं.